आमदार निलेश लंकेच्या मध्यस्तीने वीजपुरवठा सुरळीत - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Wednesday, February 24, 2021

आमदार निलेश लंकेच्या मध्यस्तीने वीजपुरवठा सुरळीत

 आमदार निलेश लंकेच्या मध्यस्तीने वीजपुरवठा सुरळीत

जितेश सरडे यांनी महावितरण अधिकाऱ्यांबरोबर विविध विषयांवर केली चर्चा

सरडे यांनी शेतकरी वर्गाचे अनेक प्रश्न सोडवण्यासाठी केले प्रयत्न

 


नगरी दवंडी


पारनेर- पारनेर तालुक्यातील वडझिरे, लोणीमावळा, देवीभोयरे, राधे, गारखिंडी, अळकुटी, तसेच इतर गावातील  सर्व शेतकरी बांधव वडझिरे वीज केंद्रावर वर मोठ्या संख्येने आले. या वीज केंद्रावर अवलंबून असणाऱ्या सर्व आजूबाजूच्या गावातील शेतकऱ्यांची महिन्यापासून होत असलेली विजेबाबतची हेळसांड,  ट्रांसफार्मरचे प्रॉब्लेम, वाढते भारनियमन, वीज बिल माफी, विजेचा असलेला अनियमितपणा,कमी प्रमाणात वीज सोडणे, यासारख्या सर्व समस्यांना न्याय देण्यासाठी जितेश सरडे यांनी केलेल्या अहवानानुसार जितेश सरडेंनी सर्व शेतकऱ्यांच्या बाजूने म्हणणे मांडले व त्याला महावितरण अधिकारी चरडे साहेबांनी मागण्या मान्य करून लगेच काम सुरू केले.

स्वतः जितेश सरडेंनी आमदार निलेश लंकेशी फोनवरून चरडे साहेबांची चर्चा घडवून आणली तेव्हा व्हाट्सएप वर 5000 रुपये वडझिरे ट्रांसफार्मरच्या संदर्भात असलेला संदेश हा निघोज साठी असल्याचे सांगितले व वडझिरे संदर्भात हा संदेश खोटा असून महावितरन कडून असा कोणताही मेसेज टाकण्यात आला नाही. अशा अफवा पसरवू नये की जेणेकरून शेतकऱ्यांच्या मनात संभ्रम निर्माण होईल असे स्वतः चरडे साहेबानी सांगितले व त्यानुसार जितेश सरडे शेतकरी वर्ग अडचणीत असल्याने त्यांच्याकडून मुदातववाढ घेतली त्यानुसार चरडे साहेबानी 50000 रुपये ट्रान्सफार्मर मागे भरण्यास वडझिरे गावास 1 मार्च पर्यंत मुदतवाढ दिली. 

      त्यानंतर स्वतः चरडे साहेबांनी जितेश सरडेंच्या संपर्क कार्यालयाला भेट दिली व नोकरवर्ग कमी असल्याचे लक्षात आल्यावर स्वतः जितेश सरडेंनी कंत्राटी मुले भरण्याचे आश्वासन साहेबांकडून घेतले. जवळपास 70 ते 80 शेतकरी उपस्थित होते. यावेळी सरपंच डॉ. सुभाष मावळे, चेअरमन संतोष शेंडकर, पोपट शेटे, तुळशीराम करकंडे, सुभाष सुरुडे, अनिल चौधरी, धोंडिभाऊ झिंजाड, शिवराज कदम, युवराज मोरे, सोपान करकंडे हे तसेच शेतकरी वर्ग ग्रामस्थ हजर होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here