नगरसाठी भरघोस निधीची महापौरांची ना. शिंदेकडे मागणी. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, February 12, 2021

नगरसाठी भरघोस निधीची महापौरांची ना. शिंदेकडे मागणी.

 नगरसाठी भरघोस निधीची महापौरांची ना. शिंदेकडे मागणी.


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः पिंपळगाव माळवी येथील मनपाच्या 700 एकर जागेत रामोजी फिल्म सिटी सारखा प्रकल्प, अमेझॉन पार्क सारखा प्रकल्प, सौर ऊर्जा प्रकल्प, सावेडी भागात आद्ययावत हॉस्पिटल उभारणी,तसेच शहरातील रस्ते मजबुतीकरण इत्यादी मागण्यांसाठी निधी शासनाकडून उपलब्ध व्हावा अशी मागणी महापौर बाबासाहेब वाकळे यांनी नगर विकास व सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांचेकडे केली.
ना. एकनाथ शिंदे यांना महापौर बाबासाहेब वाकळे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की अहमदनगर महानगरपालिकेचे दिनांक 30 जून 2003 रोजी महानगरपालिकेमध्ये रूपांतर होवून 11 गावांचा महानगरपालिका हद्दीमध्ये समावेश करण्यात आला. सदर हद्दीवाढीच्या गावांमध्ये मुलभूत नागरी सुविधा देणे आवश्यक आहे. सदर गावांतील अंतर्गत रस्ते, गटर, पिण्याच्या पाणी, विद्युत व्यवस्था इ. विकास कामे करणे आवश्यक आहे. महानगरपालिकेची आर्थिक परिस्थिती अत्यंत नाजूक आहे.  महानगरपालिकेस  दैनंदिन खर्चापोटी पाणीपुरवठा वीज बिल, पथदिवे वीजबील, मनपा कर्मचारी यांचे वेतन , सेवा निवृत्त कर्मचारी पेन्शन , ठेकेदार व पुरवठा यांचे देयके यांचा अत्यावश्यक खर्च आहे. त्यामुळे निधी अभावी शहरातील विकास कामांवर परिणाम होतो.
श्रीराम चौक ते भिस्तबाग चौक ते नगर मनमाड हायवे पर्यत रस्त्याचे कॉक्रीटीकरण  व दोन्ही साईडने गटर व सुशोभिकरण करण्यासाठी 30 कोटी, सावेडी भिडे हॉस्पीटल चौक ते वैदुवाडी ते पाईपलाईन रोड पर्यत रस्ता कॉक्रीटीकरण व दोन्ही साईडने गटर व सुशोभिकरण  करण्यासाठी 20 कोटी, पारिजात चौक ते एकविरा चौक ते जुना पिंपळगांव रोड, तपोवन रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरण व दोन्ही साईडने गटर व सुशोभिकरण, विद्युतीकरण करण्यासाठी 5 कोटी, नित्यसेवा चौक ते भगवानबाबा चौक ते मुळे एसटीडी निर्मलनगर पर्यत रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरण साईड गटर करण्यासाठी2 कोटी,
नगर मनमाड रोड खंडोबा मंदिर ते बोल्हेगांव रस्ता ते निंबळक पर्यत रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरण करण्यासाठी 3 कोटी,  भिंगारवाला चौक ते सर्जेपूरा चौक ते अप्पू हत्ती चौकापर्यत रस्ता कॉक्रीटीकरण, दोन्ही साईडने गटर, फुटपाथ ,पथदिव्याची व्यवस्था  आदी कामे  करण्यासाठी 20 कोटी, केडगांव येथील अंबिका नगर बसस्टॉप ते अंतर्गत परिसरातील रस्ते तसेच शिवाजी मंगल कार्यालय पर्यत रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरण  करण्यासाठी 5 कोटी निधी मिळावा अशी मागणी महापौरांकडून करण्यात आली.तसेच
नगर शहराची वाढती लोकसंख्या पाहता उपनगरासाठी सावेडी भागामध्ये हॉस्पीटल बांधण्याचा अहमदनगर महानगरपालिकेचा मानस आहे.  सावेडी भागामध्ये मनपाचे रूग्णालय नसल्यामुळे गोरगरिब नागरिकांना शहरातील मनपाच्या दवाखान्यात यावे लागते. कै.बा.देशपांडे दवाखान्याची इमारत शहरामध्ये असून ती जागा अपुरे पडते उपनगरातील सावेडी, बोल्हेगांव, नागापूर, निर्मलनगर या भागातील नागरिकांना शहरामध्ये उपचार करण्यासाठी येण्यास अंतर लांब आहे.  गोरगरिबांच्या सेवेसाठी सावेडी भागात अदयावत रूग्णालय झाल्यास नागरिकांची गैरसोय दूर होईल व गोरगरिब रूग्णांना वेळेत उपचार मिळणे सोयीचे होईल.  त्यासाठी मा.शासनाकडून निधी मिळणे आवश्यक आहे. सदरील अदयावत रूग्णालयाची नविन इमारत उभारणे करिता मा.शासनाने रक्कम रूपये 10 कोटी निधी मंजूर करावा
 अहमदनगर महानगरपालिकेचे सुधारित सेवा प्रवेश नियम व आकृतीबंधास मा.शासनाने दिनांक 6 फेबु्वारी 2016 रोजी मान्यता दिलेली आहे. तथापी सुधारित आकृतीबंधास मा.शासनाने अटी व शर्तीच्या अधीन राहून मंजूरी दिलेली असून नविन आकृतीबंधामुळे उपलब्ध होणारी पदे आस्थापना खर्च विहीत मर्यादेत (35 %) असल्यास विहित मार्गाने भरता येतील, याप्रमाणे सुचीत केले आहे. अहमदनगर महानगरपालिकेचे आस्थापना खर्चाची टक्केरी 35 % पेक्षा जास्त असल्याने अहमदनगर महानगरपालिकेचे सुधारित सेवाप्रवेश नियम व आकृतीबंध मंजूर असून देखील सरळ सेवेने पद भरणे बाबतची कार्यवाही करण्यांत आलेली नाही.
अहमदनगर शहराची हद्दवाढ करण्यात येवून शहरालगतच्या ग्रामपंचायतींचा अहमदनगर शहरामध्ये विलीन करण्यांत येवून दिनांक 30 जून 2003 रोजी तत्कालीन अहमदनगर नगरपरिषदेचे महानगरपालिकेत रूपांतर झालेले आहे. अहमदनगर नगरपरिषदेचे महानगरपालिकेत रूपांतर झाल्यानंतर सुधारित सेवाप्रवेश नियम अभावी सन 2003 पासून 2016 पर्यत सरळसेवेने पद भरणे बाबतची कार्यवाही करण्यांत आलेली नाही. अधिकारी व कर्मचारी नियत वयोमानानुसार किंवा इतर कारणांमुळे सेवानिवृत्त होत असून दिवसेंदिवस रिक्त पदांच्या संख्येत वाढ होत आहे. परिणामी अहमदनगर महानगरपालिकेतील कार्यरत अधिकारी व कर्मचारी यांचेवर कामाचा ताण वाढत चालला आहे. त्यामुळे अधिकारी व कर्मचा-यांमध्ये स्वेच्छासेवानिवृत्ती घेण्याचे प्रमाणही वाढत चालले आहे.
 उपरोक्त कारणांमुळे मा.शासनाकडे वेळोवेळी आस्थापना खर्चाची मर्यादा शिथील करून पद भरणेस मंजूरी मिळणेबाबतचा प्रस्ताव सादर करण्यात आलेला आहे. तसेच वरिष्ठ रिक्त पदांवर प्रतिनियुक्तीने अधिकारी मिळणे बाबतचा प्रस्ताव सादर करण्यात आलेले आहेत.यास मंजुरी मिळावी असेही निवेदनात म्हटले आहे.

No comments:

Post a Comment