डॉ. राळेगणकर व डॉ.लामरुड यांच्या शोध निबंधास प्रथम पारितोषिक - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, February 24, 2021

डॉ. राळेगणकर व डॉ.लामरुड यांच्या शोध निबंधास प्रथम पारितोषिक

 डॉ. राळेगणकर व डॉ.लामरुड यांच्या शोध निबंधास प्रथम पारितोषिक


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः नागपूर विद्यापीठ व अमरावती विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘रिसेंट अ‍ॅडव्हान्सेस इन मटेरियल सायन्स आणि नॅनो टेक्नोलॉजी’ या विषयावरील आंतरराष्ट्रीय ई-परिषदेत अहमदनगर महाविद्यालयातील प्राध्यापक डॉ.सचिन राळेगणकर (पदार्थ विज्ञान विभाग) व प्रा.डॉ.प्रसाद लामरुड (वनस्पतीशास्त्री विभाग) यांच्या शोध निबंधास सर्वोत्तम शोध निबंधाचे प्रथम पुरस्कार मिळाला.
या ई- परिषदेमध्ये भारतासह जर्मनी, रशिया, पोलंड, स्पेन, चीन, सिंगापूर, इजिप्त, दुबई, स्वीडन आदि देशातील 165 च्या पेक्षा अधिक संशोशकांनी सहभागी होऊन आपले सादरीकरण केले होते. या यशाबद्दल अहमदनगर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आर.जे.बार्नबस यांनी पुरस्कारप्राप्त प्राध्यापकांचे कौतुक करुन अभिनंदन केले. याप्रसंगी डॉ.प्रविण मोरे उपस्थित होते.

No comments:

Post a Comment