श्रीगणेश व शिवजयंतीनिमित्त आयोजित भिंगारच्या मोफत नेत्रतपासणी शिबिरास नागरिकांचा प्रतिसाद - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Friday, February 19, 2021

श्रीगणेश व शिवजयंतीनिमित्त आयोजित भिंगारच्या मोफत नेत्रतपासणी शिबिरास नागरिकांचा प्रतिसाद

 श्रीगणेश व शिवजयंतीनिमित्त आयोजित भिंगारच्या मोफत नेत्रतपासणी शिबिरास नागरिकांचा प्रतिसाद


नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः भिंगार येथील सम्राट तरुण मंडळ, फिनिक्स सोशल फाऊंडेशन व आनंदऋषीजी हॉस्पिटलच्या संयुक्त विद्यमाने श्री गणेश व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त मोफत नेत्र तपासणी, मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीर घेण्यात आले. या शिबीरास नागरिकांचा उत्सफुर्त प्रतिसाद लाभला. तसेच गणेश मंदिरात महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. यावेळी भिंगार राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजय सपकाळ, फिनिक्स फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष जालिंदर बोरुडे, डॉ. किरण कवडे, संजय शिंदे, अनुज चष्मावाला, प्रशांत शिंदे आदी उपस्थित होते.
संजय सपकाळ म्हणाले की, शिवाजी महाराज एका समाजापुरते मर्यादित नसून, त्यांनी अठरापगड जातीच्या मावळ्यांना बरोबर घेऊन रयतेचे राज्य निर्माण केले. दुर्बल व वंचित घटकांना न्याय मिळण्यासाठी समाजाला त्यांच्या विचारांची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here