वारुळाचा मारुती परिसरात नागरी सुविधांचा बोजवारा - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Monday, February 8, 2021

वारुळाचा मारुती परिसरात नागरी सुविधांचा बोजवारा

 वारुळाचा मारुती परिसरात नागरी सुविधांचा बोजवारा

पाणी, भुयारी गटार योजना व पथदिव्यांची मागणी


नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः शहरातील वारुळाचा मारुती येथील नागरिकांना अनेक वर्षापासून नागरी सुविधा मिळत नसल्याने पीपल्स हेल्पलाईन, भारतीय जनसंसद व मेरे देश मे मेरा अपना घर आंदोलनाच्यावतीने महापालिका प्रशासनाच्या टंगळ-मंगळ अनागोंदी कारभाराचा सत्यबोधी सुर्यनामा आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती अ‍ॅड. कारभारी गवळी यांनी दिली.
शहरातील झोपडपट्टीचे अतिक्रमण काढून महापालिकेने 2016 साली वारुळाचा मारुती येथे त्यांचे पुनर्वसन केले. येथे 240 फ्लॅटमध्ये सुमारे दीड हजार नागरिक राहतात. तसेच या प्रकल्पा शेजारी असलेल्या 240 फ्लॅटमध्ये महापालिकेचे सफाई कर्मचारी राहतात. मात्र येथील नागरिकांना पाणी, स्वच्छता व लाईटचे प्रश्न अद्यापि सोडविण्यात आलेले नाहीत. या प्रकल्पासाठी व येथील नागरिकांसाठी लाखो रुपये खर्च करुन 2015 साली पाण्याची टाकी बांधण्यात आली. टाकी बांधून पडिक अवस्थेत असून, त्यामधून नागरिकांना पाणी वाटपासाठी नळ योजना कार्यान्वीत करण्यात आलेली नाही. पाच वर्षात थेंबभर पाणी या टाकीत आलेले नाही. पिण्यासाठी येथील नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत असून, अजूनही टँकरने या भागात पाणीपुरवठा सुरु आहे. अनियमीतपणे टँकरद्वारे होत असलेल्या पाणीपुरवठ्यामुळे महिलांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. तसेच या भागात भूयारी गटार योजना नसल्याने स्वच्छतेचा बोजवारा उडाला आहे. उघड्या गटारी व डासांचा उच्छादामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. तसेच या भागात पथदिवे नसल्याने नागरिकांना रात्री बाहेर पडता येत नाही. तर अंधारामुळे अनेक लहान-मोठे अपघात घडत असल्याचे संघटनेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.या भागाची संघटनेच्या वतीने नुकतीच पहाणी करण्यात आली. नागरिकांना महापालिका प्रशासनाच्या टंगळ-मंगळ अनागोंदी कारभारामुळे त्रास सहन करावा लागत असून, सदर भागात नागरी सुविधांचा बोजवारा उडाला आहे. नागरिकांना मुलभूत नागरी सुविधा मिळण्यासाठी स्थानिक नागरिकांसह संघटनांच्या वतीने महापालिकेत दि.27 फेब्रुवारी रोजी सत्यबोधी सुर्यनामा आंदोलन करण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here