आधुनिक तंत्रज्ञानाचे शिक्षण घेणे ही बदलत्या काळाची अत्यावश्यक गरज आहे ः झावरे - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Wednesday, February 3, 2021

आधुनिक तंत्रज्ञानाचे शिक्षण घेणे ही बदलत्या काळाची अत्यावश्यक गरज आहे ः झावरे

 आधुनिक तंत्रज्ञानाचे शिक्षण घेणे ही बदलत्या काळाची अत्यावश्यक गरज आहे ः झावरे


नगरी दवंडी/प्रतिनिधी
पारनेर ः येथील न्यू आर्टस् कॉमर्स अँण्ड सायन्स महाविद्यालयात व्हर्च्युअल क्लासरूम हा विभाग व लँग्वेज लॅब या दोन्ही विभागांचे उद्घाटन संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार झावरे, उपाध्यक्ष रामचंद्र दरे, सचिव जी.डी.खानदेशे,महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रंगनाथ आहेर, उपप्राचार्य डॉ. दिलीप ठुबे यांच्या हस्ते करण्यात आले.
व्हर्च्यूअल क्लासरूमधून ऑनलाईन पद्धतीने लेक्चर्स देणे, व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे विविध व्याख्यानांचे आयोजन करून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणे, विविध ऑनलाइन कार्यशाळा आयोजित करणे, गूगल क्लासरूम, झूम अ‍ॅप, गुगल मीट, इत्यादी माध्यमांद्वारे विद्यार्थ्यांशी ऑनलाइन पद्धतीने संवाद साधणे अशा विविध वैविध्यपूर्ण आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून आज विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात येते. हा विभाग अत्याधुनिक सोयी,सुविधांनी सुसज्ज असून विद्यार्थ्यांसाठी भविष्यकाळाच्या दृष्टीने अत्यंत उपयुक्त आहे. तसेच भाषेच्या विद्यार्थ्यांना भाषा अधिक चांगली येण्यासाठी, त्या त्या भाषेतील उच्चार, शुद्धलेखन,भाषेत होणारे काळानुरूप बदल या सर्व बाबी लक्षात घेऊन महाविद्यालयात लँग्वेज लॅब निर्माण करण्यात आलेली आहे.या लॅबचे उद्घाटनही यावेळी करण्यात आले. या लॅबमधूनही विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण घेण्यास मदत होणार आहे.
या कार्यक्रमाप्रसंगी बोलताना संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार झावरे म्हणाले, काळानुरूप शिक्षणपद्धतीत बदल होत आहेत. आजचा विद्यार्थी हा कौशल्याधिष्ठित असायला हवा. माहिती तंत्रज्ञानात होणारे नवनवीन बदल हे विद्यार्थ्यांनी  आत्मसात करायला हवेत.आज शिक्षणातून ज्या नवीन रोजगाराच्या संधी प्राप्त होतात त्या मिळविण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान अवगत करणे आवश्यक आहे. या तंत्रज्ञानामुळे आपण आपल्या देशातीलच नव्हे तर जागतिक पातळीवरील अनेक चांगले मार्गदर्शक, संशोधक, शास्त्रज्ञ, लेखक, कवी यांचे मार्गदर्शन मिळवणार आहे त्यामुळे जीवनाच्या पुढील वाटचालीत दिशादर्शक आणि मार्गदर्शक ठरणार आहे.
याप्रसंगी बोलताना संस्थेचे उपाध्यक्ष रामचंद्र दरे म्हणाले, आजचा विद्यार्थी हा उद्याचा एक जबाबदार नागरिक म्हणून समाजामध्ये पुढे येणार आहे.अशावेळी समाजाचे डोळसपणे निरीक्षण करता यावे.त्याला समाजाबद्दल आपले विचार स्पष्टपणे आपल्या भाषेत मांडता यावेत. या उद्देशाने लँग्वेज लॅब महाविद्यालयात उभारली आहे ती विद्यार्थ्यांच्या भविष्यकाळाच्या दृष्टीने त्यांना खूप उपयोगी ठरणार आहे.
याप्रसंगी बोलताना संस्थेचे सचिव जी. डी. खानदेशे म्हणाले,अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या विविध महाविद्यालयांमध्ये पारनेर महाविद्यालय हे नवीन बदलांना आत्मसात करण्यासाठी आणि नवीन प्रयोग राबवण्यासाठी सातत्याने पुढाकार घेत असते. या दृष्टीने तालुक्यातील पर्यटन स्थळ म्हणून आज महाविद्यालयाकडे पाहिले जाते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here