आई-वडिलांचा सांभाळ न करणार्‍यांच्या पगाराला प्रशासनाकडून कात्री - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, February 27, 2021

आई-वडिलांचा सांभाळ न करणार्‍यांच्या पगाराला प्रशासनाकडून कात्री

 आई-वडिलांचा सांभाळ न करणार्‍यांच्या पगाराला प्रशासनाकडून कात्री



नगरी दवंडी

अहमदनगर -कोरोनामुळे राज्यातील परिस्थिती खुप गंभीर झाली असून, धक्कादायक घटना देखील घडतच आहेत.शासकीय नोकरदार असूनही अनेकजण वृद्धपकाळात आई-वडिलांना वृद्धाश्रमाची वाट दाखवतात. तर अनेकजण आपल्या आई-वडिलांचा सांभाळ देखील करीत नाहीत.

आई-वडिलांचा सांभाळ करीत नाही. त्यांना आता प्रशासनानेच वेसन घालण्याचा प्रयत्न केला आहे. जे गुरूजी, इतर कर्मचारी आई-वडिलांचा संभाळ करीत नाहीत,त्यांच्या थेट पगारालाच कात्री लावली जाणार आहे. नगर जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत हा निर्णय झाला आहे.

प्राथमिक शिक्षक बँकेसह इतर कर्मचाऱ्यांच्या कर्जाच्या हप्त्यांची वसुलीही केली जाणार नाही.तसा ठरावच जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत घेण्यात आला.

जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष राजश्री घुले यांच्या अध्यक्षतेखाली सर्वसाधारण सभा पार पडली. यावेळी जिल्हा परिषद सदस्य राजेश परजणे यांनी जे कर्मचारी आई-वडिलांचा संभाळ करीत नाही.

त्यांच्या पगारातून 30 टक्के रक्कम कपात करावी, असा मुद्दा मांडला. त्याला जालिंदर वाकचौरे, शरद नवले आदींनी चर्चेत भाग घेतला.त्यानंतर हा ठराव करण्यात आला. आई-वडिलांनी पालन-पोषण केल्यानंतरच मुले सक्षम होतात.

पण त्यांच्या वृद्धपकाळात मुलांना आई-वडिलांच्या कष्टचा जनू विसरच पडतो, तर अनेकांना नीटनेटकी वागणूकही मिळत नाही.परिणामी मुलगा शासकीय नोकरदार असताना देखील त्यांना वृद्धपकाळात आई-वडिलांना वृद्धाश्रमाची वाट दाखवतात. यावर हा उत्तम पर्याय राहणार आहे.

No comments:

Post a Comment