भास्कर पेरे यांचा जामखेड पत्रकाराच्या वतीने जाहीर निषेध - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Monday, February 1, 2021

भास्कर पेरे यांचा जामखेड पत्रकाराच्या वतीने जाहीर निषेध

 भास्कर पेरे यांचा जामखेड पत्रकाराच्या वतीने जाहीर निषेध



नगरी दवंडी


 जामखेड बातमी -औरंगाबाद जिल्ह्यातील पाटोदा गावचे आदर्श माजी सरपंच भास्करराव पेरे यांनी जामखेड येथील निवारा बालगृहाच्या निवारा महोत्सव कार्यक्रमाच्या व्याख्यानादरम्यान पत्रकाराच्या संदर्भात अपशब्द व निंदा नालास्तीपर वक्तव्य करून तमाम पत्रकारांच्या भावना दुखावल्याने त्यांचा जामखेड येथील पत्रकारांच्या वतीने जाहीर निषेध करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली. 31 जानेवारी दुपारी बारा ते चार वाजेच्या दरम्यान जामखेड येथील ग्रामीण विकास केद्र संचालीत निवारा बालगृह या शाळेचा वार्षिक निवारा महोत्सव 20 21 हा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमासाठी प्रमुख व्याख्याते म्हणुन आदर्श माजी सरपंच भास्करराव पेरे यांना निमंत्रीत करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या व्याख्यानातुन पेरे बोलत असताना त्यांची जीभ चांगलीच घसरली. झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत भास्कर पेरे यांचा दारुण पराभव झाला. या संदर्भात पत्रकारांनी लिहलेल्या वास्तववादी बातम्या संदर्भात पेरे यांनी अतीशय खालच्या पातळीत पत्रकारांवर टिका टिपण्णी करत पत्रकारास अपशब्द वापरून तमाम पत्रकारास अपमानीत केले याचा जामखेड पत्रकारांच्या वतीने तहसिल व पोलीसांना निवेदन देऊन जाहीर निषेध करून सदर भास्कर पेरेच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली. यावेळी पत्रकार नासीर पठाण, अशोक निमोकर, मिठुलाल नवलखा, अविनाश बोधले, मैनोदिन तांबोळी, नंदुसिंग परदेशी, समीर शेख, ओंकार दळवी, प्रकाश खंडागळे,  पप्पु सय्यद, फारुख शेख, अजय अवसरे, धनराज पवार रोहीत राजगुरु सह सर्व पत्रकार उपस्थित होते. यावेळी सर्वानी आपल्या संतप्त प्रतिक्रीया दिल्या असुन सबंधीत आधिकाऱ्यांनी सर्वस्वी चौकशी करून गुन्हा दाखल करण्यात येईल असे सांगीतले आहे.

No comments:

Post a Comment