उद्या ‘व्हॅलेनटाईन डे’ - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Saturday, February 13, 2021

उद्या ‘व्हॅलेनटाईन डे’

 उद्या ‘व्हॅलेनटाईन डे’

‘प्रेमात पडणं सोप्पं, पण व्यक्त होणं महाकठीण.

उद्या 14 फेब्रुवारी हा तमाम युवक युवतींना प्रेम भावना व्यक्त करण्यासाठी व्हॅलेंटाईन या संताने उपलब्ध करून दिलेला दिवस... 
    काळानुरूप बदलत जाणार्‍या ‘सांकेतिक भाषेत’ (कोड लँग्वेज) याही शब्दाची ‘आय लव्ह यू’ म्हणून पर्यायी ओळख झाली आहे हे आता मान्य करावं लागेल. त्यामुळे आता सावध पवित्रा घेणं गरजेचं आहे, निदान मुलींनी तरी. कारण उद्याच्या प्रेमाच्या दिवशी म्हणजे ‘व्हॅलेंटाइ डे’ मध्ये जर कुणी ख र्ङेींश र्धेी ? असं विचारत असेल तर थेट समजून जायचं, त्याचा ‘इरादा’ काय आहे. आता त्या इराद्यावर नकार असेल तर उत्तर देण्यासाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेच. पण जर इरादा याही बाजूने पक्का असेल तर ख र्ङेींश र्धेी असं म्हणायला हरकत नाही.
    प्रेम काळानुरूप बदलत जातं. मागे डोकावून पाहिलं तर तेव्हाचं प्रेम हे अधिक शृंगारिक वाटतं. प्रेयसीला पत्र, चारोळ्या असे प्रकार व्हायचे. कधी तरी रीतसर ओळख काढून मागणी घातली जायची. अगदी काहीसं मागे म्हणजे समाजमाध्यम हातात नव्हतं तेव्हाही व्यक्त होण्यासाठी भेटीगाठी, ओळखपाळख काढली जायची. मित्र-मैत्रिणींकडून निरोप पोहोचवले जायचे आणि मग प्रेम जुळायचं. तेही सहजपणे नाहीच. त्या मानाने आजची पिढी भलतीच प्रगत आणि गतिमान आहे. प्रत्येकाच्या हातात स्मार्टफोन, नाना तजहेची समाजमाध्यमं आल्याने संवाद सहज शक्य झाला आहे. परिणामी प्रेमाची भाषा- परिभाषाही बदलू लागली आहे. ‘माझं तुझ्यावर प्रेम आहे’ हे वाक्य आता पुरतं आऊटडेटेड झालंय. ‘ख र्ङेींश र्धेी’ चा पर्याय समोर असल्याने मराठीतील ‘ते’ शब्द आता इतिहासजमा झालेत असंही म्हणणं वावगं ठरणार नाही. मग मनातलं तेही मातृभाषेत सोप्या शब्दात मांडायचं तरी कसं?
   ख र्ङेींश र्धेी  या शब्दाला सध्या अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झालंय. कारण या वाक्याच्या नव्याने झालेल्या अर्थबोधाने अनेकांचे ‘दिल मिल गए’. तरुणाईमध्ये तर हा चर्चेचा विषय झालाय. कारण वाक्य नसून आता जीवनाशी संबंधित वाक्य झालेलं आहे. थोडं आश्चर्य वाटेल खरं पण प्रियकराकडून प्रेयसीपर्यंत आपल्या भावना पोहोचवण्याचा श्रीगणेशा या वाक्याने केला जातो आहे. अर्थात हे प्रत्यक्षात विचारलं जात नाही, तिचा नंबर असेल तर व्हॉट्सअ‍ॅपवर किंवा नसेल तर फेसबुक, इन्स्टा किंवा अन्य शब्दसंवाद माध्यमावर.हे वाक्य इतकं प्रचलित होईल कुणालाच ठाऊक नव्हतं. कारण कुणी कितीही जवळचं असलं तरी आपण आपल्या ‘त्या’ जवळच्या व्यक्तीसोबत काय बोलतोय हे काही कुणाला सांगत नाही. पण फेसबुकसारख्या माध्यमावर जेव्हा हे समोर आलं तेव्हा एकूणच तरुण वर्गाने याला दुजोरा दिला आणि बहुसंख्य तरुण प्रेमात पडल्यानंतर ‘ति’च्याशी संवाद साधताना ‘ख र्ङेींश र्धेी’ हेच पहिलं वाक्य उच्चारतात हे एकमुखाने सिद्ध झालं. बरं केवळ तरुणांनीच नाही तर तरुणींनीही याचं समर्थन केलं आहे. ‘हे वाक्य आलं की आम्ही समजून जातो, समोरच्याच्या मनात काय आहे’, अशी भावना तरुणी व्यक्त करतात.‘प्रेमात पडणं सोप्पं, पण व्यक्त होणं महाकठीण. अशा वेळी समोरची व्यक्ती काय म्हणेल, नकार देईल का, त्यात जवळची मैत्रीण असेल तर ठार मेलोच मैत्रीच राहिली नाही तर अशा नाना शंका प्रेम व्यक्त करण्यापूर्वी मनात येतात. अनेकदा व्यक्त व्हायची हिंमत असते, पण शब्द सापडत नसतात. सुरुवात कुठून करावी हेच कळत नाही. अशा वेळी ‘ख र्ङेींश र्धेी’ या वाक्याने सुरुवात केली तर जरा भीड चेपते’, अशी भावना एका महाविद्यालयीन तरुणाने व्यक्त केली आहे. पुढे तो असंही म्हणतो की, ‘या वाक्याने अंदाज येतो, समोरची व्यक्ती पटण्यासारखी आहे की नाही.
      कॉलेजमध्ये असताना मुलींपुढे व्यक्त होताना थंडीताप यायचा. तिचा भाऊ मध्ये आला तर, तिनं सरांना सांगितलं तर, कॉलेजमध्ये काही झालं तर याच विचारात प्रेमाचा विचार विरून जायचा’, असं एका तिशीतल्या तरुणाने सांगितलं. कॉलेजमधल्या आठवणींना उजाळा देताना ‘भावना एकाच्या आणि शब्द दुसर्‍याचे’ याचा गमतीशीर किस्साही त्याने सांगितला, ‘ज्यांना छान लिहिता यायचं, कविता करता यायच्या अशा मंडळींना तेव्हा फारच डिमांड होती. अगदी अशा मित्राच्या पाया पडून आम्ही कविता लिहून घेतल्या आहेत. आपल्यासाठी कुणी तरी काही तरी लिहिलंय याचं तेव्हा मुलींना फार अप्रूप वाटायचं. किंबहुना तिथंच अर्धी मोहीम फत्ते व्हायची. मग त्यासाठी मित्राच्या पाया पडाव लागलं तरी चालेल, पण तिच्यासमोर ‘इज्जत का सवाल’ महत्त्वाचा असायचा.’ हा झाला वैयक्तिक अनुभव. समाजमाध्यमांवर, विशेषकरून फेसबुकवर याविषयी बराच शब्दप्रपंच दिसतो. ‘र्ङेींश र्धेी’ नावाने स्वतंत्र पेजही पाहायला मिळतात. ज्यामध्ये प्रेमाविषयी विनोद, चारोळ्या, शब्दकोट्या, मिम्स असं बरंच काही आहे. शिवाय अनेकांनी याविषयी लिहिण्यातही पुढाकार घेतला आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here