संत गाडगे महाराज यांच्या जयंती निमित्ताने वंचित बहुजन आघाडी व जयहिंद युवक मंडळाचे अभिवादन - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, February 23, 2021

संत गाडगे महाराज यांच्या जयंती निमित्ताने वंचित बहुजन आघाडी व जयहिंद युवक मंडळाचे अभिवादन

 संत गाडगे महाराज यांच्या जयंती निमित्ताने वंचित बहुजन आघाडी व जयहिंद युवक मंडळाचे अभिवादन


नगरी दवंडी/प्रिंतनिधी

अहमदनगर ः संत गाडगे महाराज यांच्या 145 व्या जयंतीनिमित्त वंचित बहुजन आघाडी व जय हिंद युवक मंडळ शीला विहार यांच्या संयुक्त विद्यमाने अहमदनगर येथील तारकपूर स्टँडवर स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते,यावेळी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रतिक बारसे,महासचिव योगेश साठे,संघटक फिरोज पठाण,भाऊ साळवे,मनोज कर्डिले,अमर निरभवणे,राहुल कांबळे,विशाल थोरात तसेच जयहिंद युवक मंडळाचे शशिकांत दळवी,अजय दळवी,अभिजीत दळवी,अभिजीत बल्लाळ त्याच बरोबर संत गाडगे महाराज उत्सव समितीचे अध्यक्ष सतिश दळवी व समस्त परीट समाज बांधव उपस्थित होते. तारकपूर बस स्थानक सफाई कर्मचारी यांना हॅन्ड ग्लोज, सॅनिटायझर,मास्क देत,संपूर्ण तारकपूर बस स्थानक स्वच्छता करून सॅनिटायझर फवारा मारून अभिवादन करण्यात आले.
   सध्या जगभरात र्लेींळव-19 चे संकट उभे असताना स्वच्छता पाळणे किती आवश्यक आहे याचे महत्व सर्वांना समजले आहे, संत कर्मयोगी गाडगे महाराज आपल्या हयातीत महाराष्ट्रभर फिरून कीर्तनाच्या माध्यमातून समाजातील अंधश्रद्धा, अनिष्ट रूढी, परंपरा यासंबंधी लोकांमध्ये जागरूकता निर्माण केली. लोकजीवन तेजाने उजळण्यासाठी हातीच्या खराट्याने गावाचे रस्ते झाडीत ते महाराष्ट्रात सर्वत्र फिरले. विवेकाच्या खराट्याने गावोगावी फिरून त्यांनी लोकांची मने स्वच्छ केली. खेडोपाडी, शहरोशहरी जाऊन कीर्तने केली. शिक्षणाचे महत्व गाडगे महाराजांनी लोकांना पटवून दिले. साक्षरतेचा प्रचार,प्रसार केला. गाडगे महाराज म्हणजे लोकजागृती साधणारे एक चालते फिरते विद्यापीठ होते. गाडगेमहाराज जास्त शिकलेले नव्हते; परंतु संतांचे अभंग त्यांना तोंडपाठ होते. ‘गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला’ असा गजर केल्यानंतर लगेच हरिपाठ म्हणत. गाडगे महाराजांचे कीर्तन असले म्हणजे ते ऐकण्यासाठी लोक लांबलांबून येत.स्वच्छतेचे महत्त्व लोकांना पटवून दिले.आज त्यांच्या जयंतीदिनी बाबांचा हा स्वच्छतेचा वारसा पुढे नेण्याचा व आपल्या राज्यावर आलेले हे कोरोना रुपी संकट दूर करण्यासाठी राज्यातील सर्व नागरिकांनी स्वच्छता पाळावी व र्लेींळव-19 चे सर्व नियमांचे पालन करावे. (उदा. सोशल डिस्टंसिंग, सॅनिटायझर ,व मास्क) सध्या महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये कोरोनाचे चे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. आपल्या अहमदनगर शहरांसह राज्यात ही कोरोनाची संभाव्य दुसरी लाट येणार नाही. यासाठी स्वच्छता ठेवणे व र्लेींळव-19 च्या नियमांचे पालन करण्याची प्रेरणा सर्व नागरिकांना मिळावी यासाठी या स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. आज बदललेल्या परिस्थितीत संत गाडगेबाबांना हेच खरे अभिवादन ठरेल यात शंका नाही.याप्रसंगी जिल्हाध्यक्ष प्रतिक बारसे,शशिकांत दळवी,अभिजीत बल्लाळ यांचे भाषण केले. तारकपूर बस स्थानक चे प्रमुख मा.परदेशी साहेब यांनी संत गाडगे महाराज यांच्या जयंतीच्या शुभेच्छा देत, स्वच्छ्ता मोहीम राबविनार्‍या वंचित बहुजन आघाडीचे आणि जयहिंद युवक मंडळाचे पदाधिकारी,कार्यकर्ते यांचे आभार मानले.

No comments:

Post a Comment