चैनस्नॅचींग चोरट्यांचा बंदोबस्त करा - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, February 9, 2021

चैनस्नॅचींग चोरट्यांचा बंदोबस्त करा

 चैनस्नॅचींग चोरट्यांचा बंदोबस्त करा

विनायकराज प्रतिष्ठानची तोफखाना पोलिसांकडे मागणी
तोफखाना पोलीस चौकीची हद्द मोठी आहे आणि पोलीस कर्मचारी फक्त 70 ते 80 आहेत. त्यामुळे पोलीस कर्मचारी वाढवण्यात यावे तसेच उपनगरसाठी स्वतंत्र पोलीस चौकी देण्यात यावी असा प्रस्ताव शासनाकडे बर्‍याच महिन्यापूर्वी पाठवला आहे. चोरांचाही लवकरात लवकर बंदोबस्त करू.
- पो.नि. सुनील गायकवाड


नगरी दवंडी/प्रिंतनिधी

अहमदनगर ः सोमवार 8 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 4 ते 7 च्या वेळेत उपनगरातील 5 ते 6 महिलांच्या गळ्यातून मंगळसूत्र सोने- चैन चोरट्यांनी टूव्हिलर वरून ओढून नेल्याचे समजते. या चोरट्यांचा तत्काळ बंदोबस्त करण्यात यावा या मागणीचे निवेदन तोफखाना पोलीस निरीक्षक सुनिल गायकवाड यांना विनायकराज प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात आले.
     गायकवाड यांना दिलेल्या निवेदनात असे म्हंटले कि सोमवारी झालेल्या चोरीच्या घटनेत या काळ्या रंगाची शाईन (होंडा) दुचाकी गाडीवर तरून मुलगा असल्याचे महिलांनी सांगितले. चैनस्नॅचींगच्या घटना वारंवार वाढत असल्यामुळे नागरिक विशेष म्हणजे महिला भयभीत झाल्या आहेत. पोलिसांनी चोरट्यांचा तत्काळ शोध घेवून त्या चोरांना पकडून कडक कारवाई करावी. यावेळी युवासेना जिल्हाध्यक्ष विक्रम राठोड, प्रतिष्ठानचे अध्यक्ष विनय वाखुरे, सागर ठाकूर, पंकज राठोड, रोहित राठोड, नरेश भालेराव, मृणाल भिंगारदिवे, पप्पू भाले, सुमित धेंड, साई शिंदे, आनंत कोलते उपस्थित होते.

No comments:

Post a Comment