श्रीरामकृष्ण एज्युकेशनमध्ये इन्ट्रोडक्शन टू कोडिंग थ्रू पायथॉन या विषयावर एकदिवसीय कार्यशाळा - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Tuesday, February 23, 2021

श्रीरामकृष्ण एज्युकेशनमध्ये इन्ट्रोडक्शन टू कोडिंग थ्रू पायथॉन या विषयावर एकदिवसीय कार्यशाळा

 श्रीरामकृष्ण एज्युकेशनमध्ये इन्ट्रोडक्शन टू कोडिंग थ्रू पायथॉन या विषयावर एकदिवसीय कार्यशाळा


नगरी दवंडी/प्रिंतनिधी

अहमदनगर ः श्रीरामकृष्ण एज्युकेशन फौंडेशनचे सेठ नंदलाल धूत आणि मोहनलाल रामअवतार मानधना कनिष्ठ महाविदयालय, न्यू आर्टस, कॉमर्स ऍण्ड सायन्स महाविदयालय गणित विभाग व रोटरी क्लब ऑफ प्रियदर्शिनी यांच्या संयुक्त विदयमाने शाळेत ऍन इन्ट्रोडक्शन टू कोडिंग थ्रू पायथॉन या विषयावर एकदिवसीय कार्यशाळा घेण्यात आली. या अंतर्गत अघयावत टेक्नॉलॉजी डेटा सायन्स या विषयासाठी मूलभूत लँग्वेज पायथॉन विषयी माहिती, कोडिंग स्किल, प्रोग्राम कसा करावा याविषयी प्रा.भाग्यश्री तोडकरी व प्रा.योगिता चव्हाण यांनी मार्गदर्शन केले.इयत्ता नववीच्या विदयार्थ्यांसाठी ही कार्यशाळा घेण्यात आली.
कोडिंग सध्या खूपच प्रचलित विषय आहे व भविष्यातही डिजीटल इंडिया होण्यासाठी याचा खूप उपयोग होणार आहे. म्हणून पायथॉन ही भाषा नववीच्या विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त आहे. या नव्या विषयामुळे विद्यार्थ्यांचा पाया पक्का होण्यास निश्चितच मदत होणार आहे. विद्यार्थ्यांच्या बुध्दीमत्तेला व करियरला चालना देणारे उपक्रम नेहमीच विदयालयात राबविले जातात. या कार्यशाळेचे आयोजन रोटरी क्लब ऑफ प्रियदर्शिनीच्या अध्यक्षा  गीता गिल्डा आणि रोटरीयन श्रध्दा इंगळे यांनी केले. कार्यक्रमास रोटरी क्लब ऑफ अहमदनगर प्रियदर्शिनीच्या सेक्रेटरी देविका रेले, शशी झंवर, प्रतिभा धूत, प्राचार्या राधिका जेऊरकर, समन्वयक सावित्री पुजारी, शिक्षिका नितल मेहेर हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे निवेदन श्रेयकुमार गुंडु यांनी केले. सदर कार्यशाळेस संस्थेचे अध्यक्ष श्रीगोपाल धूत, उपाध्यक्ष नंदकुमार झंवर व मोहनलाल मानधना, सचिव डॉ. शरद कोलते, सहसचिव राजेश झंवर, संस्थेचे सदस्य बजरंग दरक यांनी शुभेच्छा दिल्या.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here