कार्यकर्त्यांना पाठबळ देऊन त्यांचे प्रश्न सोडवू- आ. सुनिल भुसारा - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Thursday, February 25, 2021

कार्यकर्त्यांना पाठबळ देऊन त्यांचे प्रश्न सोडवू- आ. सुनिल भुसारा

 आ.सुनिल भुसारा यांचे नगरमध्ये स्वागत

कार्यकर्त्यांना पाठबळ देऊन त्यांचे प्रश्न सोडवू- आ. सुनिल भुसारा

नगरी दवंडी/प्रिंतनिधी

अहमदनगर ः महात्मा फुले समता परिषदेचे राज्यभर चांगले काम सुरु असून, समाज जोडण्याचे काम यानिमित्त होत आहे. समाजातील वंचित घटकांसाठी काम करुन त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे काम या माध्यमातून सुरु आहे. शासनाच्यावतीने समाजासाठी विविध योजना कार्यान्वित करण्यात आलेल्या आहेत या योजना संबंधितांपर्यंत पोहचविण्याचे काम कार्यकर्त्यांनी करावे. नगरमध्ये समता परिषदेचे काम चांगल्या पद्धतीने सुरु आहे. नगरमधील कार्यकर्त्यांना पाठबळ देऊन त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी आपण पुढाकार घेऊ,  असे प्रतिपादन अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे पालघरचे जिल्हाध्यक्ष आमदार सुनिल भुसारा यांनी केले.
   अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे पालघरचे जिल्हाध्यक्ष व राष्ट्रवादीचे आमदार सुनिल भुसारा हे नगरमध्ये आले असता, त्यांचे  समता परिरिषदेचे महानगर अध्यक्ष दत्ता जाधव यांनी स्वागत करुन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी दत्ता जाधव यांनी समता परिषदेच्यावतीने नगरमध्ये सुरु असलेल्या कामाचा आढावा आ.सुनिल भुसारा यांना सांगितला. नगरमध्ये समता परिषदेच्या चांगल्या कामांमुळे अनेक युवक परिषदेत सहभागी होऊन योगदान देत आहेत. वरिष्ठ पातळीवरुनही सहकार्य मिळत असल्याचे सांगितले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here