बुर्‍हाणनगरमधील युवकांनी रक्तदान करुन शिवजयंती साजरी केली - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, February 20, 2021

बुर्‍हाणनगरमधील युवकांनी रक्तदान करुन शिवजयंती साजरी केली

 बुर्‍हाणनगरमधील युवकांनी रक्तदान करुन शिवजयंती साजरी केली

गुगळे कॉलनीतील चौकाला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव कौतुकास्पद :- शिवाजीराव कर्डिले

नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः छत्रपती शिवाजी महाराजांचा सुमारे 400 वर्षापूर्वीचा इतिहास आजही समाजासाठी दिशादर्शक आहे. प्रत्येकाने समाजासाठी सकारात्मक दृष्टिकोन ठेवून आपले योगदान द्यावे. त्यांनी सर्व जाती धर्मातील नागरिकांना एकत्र करून रयतेचे राज्य निर्माण केले. खर्‍या अर्थाने आजच्या युवकांना छत्रपतींच्या विचाराची गरज आहे. कोरोना संकटाच्या काळामध्ये नागरिक एकमेकांपासून दूरावले होते. आपले सण-उत्सव पारंपरिक पद्धतीने साजरे करीत असताना सामाजिक बांधिलकी जोपासण्याची खरी गरज आहे. आपले समाजासाठी काहीतरी देणे लागते, या भावनेतून काम केले पाहिजे. आजच्या युवकांनी संकटाच्या काळामध्ये पुढे येऊन रक्तदान चळवळ राबवावी, यासाठी बुर्‍हाणनगर तरुण मित्रमंडळांनी रक्तदान शिबिराचे आयोजन करुन सुमारे 100 रक्तदात्यांनी रक्तदान केले असून, युवकांसाठी हे प्रेरणादायी आहे, असे

प्रतिपादन माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांनी केले.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचे औचित्य साधून तरुण मंडळाच्यावतीने रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. तसेच गुगळे कॉलनीतील चौकाला छत्रपती शिवाजी महाराज चौक असे नामकरण करुन फलकाचे अनावरण माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांच्या हस्ते करण्यात आले. माजी मंत्री कर्डिले पुढे म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार प्रत्येक युवकाने अंगीकारावे. गुगळे कॉलनीतील चौकाला छत्रपतींचे नाव दिल्यामुळे बुऱहाणनगरच्या गौरवात नक्कीच भर पडेल. येथे सर्व जाती धर्माचे लोक एकत्र येऊन पारंपरिक पद्धतीने विविध सण-उत्सव साजरे करीत असतात. आज छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती सर्वांनी एकत्र येऊन

सामाजिक उपक्रमाने मोठ्या उत्साहात साजरी केली असे ते म्हणाले.

यावेळी सरपंच रावसाहेब कर्डिले, उपसरपंच जालिंदर जाधव, रवी कर्डिले, दत्ता तापकिरे, वैभव वाघ, अमोल धाडगे, निखिल भगत, दगडू पानसरे, किरण पानसरे, विष्णू कर्डिले, भाऊसाहेब कर्डिले, डॉ. खांदवे, दिलावर पठाण, सोमनाथ चोभे, सागर निमसे, निवृत्ती कर्डिले, सुशिल तापकिरे, दीपक धाडगे, राजू पाखरे, प्रा. राम दुसुंगे, प्रसाद तरोडे, बनकर सर, ओंकार तोडमल आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment