सहजयोग ध्यान करीत असल्यानेच सौम्याला हे चित्र काढता आले- वीणा बोज्जा - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, February 2, 2021

सहजयोग ध्यान करीत असल्यानेच सौम्याला हे चित्र काढता आले- वीणा बोज्जा

 सहजयोग ध्यान करीत असल्यानेच सौम्याला हे चित्र काढता आले- वीणा बोज्जा


अहमदनगर ः
कलारंग अकॅडमी च्या तीन दिवसीय रांगोळी कार्यशाळेत चित्रकार सुजाता औटी पायमोडे यांच्या मार्गदर्शना खाली. प. पु.श्री माताजी निर्मला देवी यांचे आतीवास्तववादी व्यक्तीचित्र  रेखाटणारी सहजयोगी कु.सौम्या जाधव हिचा सत्कार सहजयोग परिवाराच्या वतीने मा. नगरसेविका सौ. वीणाताई बोज्जा यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सहजयोगी अंबादास येन्नम, गणेश भुजबळ, कुंडलिक ढाकणे, श्रीनिवास बोज्जा, सौ. सुनंदा येन्नम, डॉ.सौ. अश्विनी जाधव व प्रशिक्षक सुजाता पायमोडे उपस्थित होते.सौम्या जाधव ही डॉ. सचिन जाधव यांची कन्या असून सुरभी हॉस्पिटल चे संचालक डॉ. दीपक जाधव यांची पुतणी आहे. कु.सौम्या हिने अवघ्या 10 वर्षांची सर्वात लहान कलाकार असून  तिची ही पहिलीच रांगोळी आहे. मी जरी मार्गदर्शन केले असले तरी त्यासाठीची ताकद तिला श्री माताजीनी दिली असे प्रशिक्षक सुजाता पायमोडे म्हणाले. कु. सौम्या ही 5 वी इयत्तेत कर्नल परब विद्यालया मध्ये शिक्षण घेत असून  तीने 3 दिवस एकूण  30 तास शांत बसून हे चित्र काढले असून असा चमत्कार करणं तसं कठीणच आहे. तिला सहजयोग परिवाराकडून संपूर्ण भारत भरातून तिचे कौतुक होत आहे.

No comments:

Post a Comment