ऊर्जा मंत्रालयाच्या वतीने घेण्यात आलेल्या विविध स्पर्धेत भाऊसाहेब फिरोदियाच्या विद्यार्थ्यांचे यश - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, February 11, 2021

ऊर्जा मंत्रालयाच्या वतीने घेण्यात आलेल्या विविध स्पर्धेत भाऊसाहेब फिरोदियाच्या विद्यार्थ्यांचे यश

 ऊर्जा मंत्रालयाच्या वतीने घेण्यात आलेल्या विविध स्पर्धेत भाऊसाहेब फिरोदियाच्या विद्यार्थ्यांचे यश


नगरी दवंडी/प्रिंतनिधी

अहमदनगर ः ऊर्जा मंत्रालय भारत सरकारच्या वतीने डिसेंबर 2020 मध्ये घेण्यात आलेल्या विविध स्पर्धेत अ.ए.सो. च्या भाऊसाहेब फिरोदिया हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी यश संपादन करीत बक्षिसे पटकाविली. ऊर्जा संवर्धन व प्रचाराकरिता शालेय विद्यार्थ्यांसाठी निबंध, वक्तृत्व, प्रश्नमंजुषा, घोषवाक्य व चित्रकला आदी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
   या स्पर्धेतील गुणवंत विद्यार्थ्यांना विद्यालयाचे मुख्याध्यापक उल्हास दुगड, उपमुख्याध्यापक संजय पडोळे, पर्यवेक्षक रवींद्र लोंढे, सुवर्णा वैद्य, अभिमन्यू डुबल यांच्या हस्ते बक्षिस देण्यात आले. संस्थेच्या प्रमुख कार्यवाह छायाताई फिरोदिया, सहकार्यवाह गौरव फिरोदिया, उपाध्यक्ष अशोक मुथा, खजिनदार प्रकाश गांधी यांनी बक्षिस पात्र विद्यार्थ्यांचे व त्यांना मार्गदर्शन करणार्‍या शिक्षकांचे अभिनंदन केले. या स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांना शोभा पालवे, अमेय कानडे, योगिनी क्षीरसागर, सतीश गुगळे, प्रमोद रामदिन या शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.

No comments:

Post a Comment