तरुण पिढीसाठी सावरकर यांचे विचार प्रेरणादायी ः अ‍ॅड. भोसले - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, February 27, 2021

तरुण पिढीसाठी सावरकर यांचे विचार प्रेरणादायी ः अ‍ॅड. भोसले

 तरुण पिढीसाठी सावरकर यांचे विचार प्रेरणादायी ः अ‍ॅड. भोसले

विश्व हिंदू परिषदेतर्फे स्वातंत्र्यवीरांना अभिवादन  

नगरी दवंडी/प्रतिनिधी

अहमदनगर ः थोर स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर हे देशाच्या स्वातंत्र्य लढ्यासाठी कायम अग्रणी राहिलेले असे जहाल मतवादी क्रांतीकारक होते.देशाच्या स्वातंत्र्यासाठी स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे महत्वपूर्ण असे योगदान आहे.सावरकरांनी भारतमातेसाठी जन्मठेप काळ्यापाण्याची शिक्षा भोगली.देशासाठी प्रखर अशी देशभक्ती त्याच्या ”ने मजसी ने परत मातृभूमीला।सागरा,प्राण तळमळला” या काव्यपंक्तीतून त्यांचं देशाप्रति असलेलं प्रेम व्यक्त होतं.आजच्या तरुण पिढीसाठी थोर स्वातंत्रसैनिक सावरकर यांचे विचार प्रेरणादायी आहे.असे प्रतिपादन विश्व हिंदू परिषदेचे जिल्हा कार्याध्यक्ष अँड जय भोसले यांनी केले.                                      नगर जिल्हा विश्व हिंदू परिषद व बजरंगदला तर्फे स्वातंत्र्यवीर सावरकर यांची पुण्यतिथीनिमित्त चौपाटी कारंजा येथील स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी विश्व हिंदू परिषदेचे जिल्हा कार्याध्यक्ष अँड जय भोसले,जिल्हा मंत्री गजेंद्र सोनवणे , मठमंदिर समितीचे प्रमुख हरिभाऊ डोळसे ,शहर सह मंत्री श्रीकांत नांदापूरकर,निलेश चिपाडे,मुकुल गंधे,प्रकाश भंडारे,उमाकांत जांभळे,मनोहर भाकरे उपस्थित होते.

No comments:

Post a Comment