मोहटादेवी संस्थान आर्थिक गैरव्यवहार.. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Thursday, February 4, 2021

मोहटादेवी संस्थान आर्थिक गैरव्यवहार..

 मोहटादेवी संस्थान आर्थिक गैरव्यवहार..

हायकोर्टाचा गुन्हे दाखल करण्याचा आदेश !

नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः
मोहोटा येथील जगदंबा देवी मंदिर संस्थानच्या आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी दाखल फौजदारी याचिकेत हायकोर्टाने दणका दिला. न्या. टी व्ही नलावडे आणि. न्या. एम.जी शेवलीकर यांनी पोलीस प्रशासनाला मोहोटा देवस्थानमधील सुवर्णयंत्र गैरप्रकारणी तत्कालीन विश्वस्तांविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात यावा. फसवणूक, आर्थिक अफरातफरी, जादूटोणा प्रतिबंध कायदा व संगनमत या कलम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा. सदर गुन्ह्याचा तपास अप्पर पोलीस अधीक्षक किंवा पोलीस उपाधीक्षक यांनी सहा महिन्याच्या आत करण्याचे आदेश दिले, याविषयीची माहिती अ‍ॅड.सतिश तळेकर यांनी दिली. यामुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.
   याबाबत सविस्तर असे की, ट्रस्टने धर्मादाय आयुक्ताची परवानगी न घेता ट्रस्टचा पैसा व सोने गैरकामासाठी वापरले. सदर सोन्यापासून सुवर्णयंत्र तयार करण्याची प्रक्रिया संशयास्पद असून त्याकामासाठी पंडित जाधवची नेमणूक कोणत्याची कायदेशीर मार्गानी झाली नव्हती. दोन किलो सोने व 25 लाख मजुरी देऊन अंधश्रद्धाला फूस देण्याचे काम विश्वस्त मंडळाने केले. सार्वजनिक मालमत्ता जादूटोणा व अंधश्रद्धेपोटी वाया घालावली. सदर ट्रस्टच्या विश्वस्त मंडळावर 2 न्यायाधीश असून देखील असे गैरकारभार झालेत. न्यायाधीश विश्वस्त असल्यामुळे सदर गैरकारभारावर कार्यवाही झाली नाही, असे निरीक्षण औरंगाबाद खंडपीठाने नोंदविले आहे. पाथर्डी तालुक्यातील मोहोटा येथील जगदंबा देवी मंदिरातील आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी माजी विश्वस्थ नामदेव गरड यांनी पाथर्डी पोलीस स्टेशन व पोलीस अधीक्षक, अहमदनगर यांना तक्रार देऊन देवस्थान येथील आर्थिक गैरव्यवहाराबद्दल गुन्हा नोंद करण्याची विनंती केली होती. सदर तक्रारींवर पोलीस प्रशासनाने कोणतीही कार्यवाही न केल्यामुळे त्यांनी औरंगाबाद खंडपीठात फौजदारी याचिका दाखल केली होती.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here