पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या अंत्योदयच्या शिकवणीवर पतसंस्थेचे काम- विकास पाथारकर - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Thursday, February 11, 2021

पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या अंत्योदयच्या शिकवणीवर पतसंस्थेचे काम- विकास पाथारकर

 पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या अंत्योदयच्या शिकवणीवर पतसंस्थेचे काम- विकास पाथारकर


नगरी दवंडी/प्रिंतनिधी

अहमदनगर ः पंडित दीनदयाळ उपाध्याय यांनी सर्वसामान्य, तळागाळातील नागरिकांचे जीवमान उंचविण्यासाठी आयुष्यभर काम केले. त्यांनी दिलेल्या अंत्योदय विचारांची शिकवण आजही मार्गदर्शक आहे. त्यांनी दाखविलेल्या मार्गावरच व अंत्योदयाच्या शिकवणीवर पंडित दीनदयाळ पतसंस्था काम करत सर्वसामान्य नागरिकांना स्वाभिमान व स्वावलंबाने उभे करण्याचे काम करत आहे, असे प्रतिपादन पंडित दीनदयाळ पतसंस्थेचे सचिव विकास पाथरकर यांनी केले.
    पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या पुण्यतिथीनिमित्त पंडित दीनदयाळ पतसंस्थेच्यावतीने त्यांच्या पुतळ्यास ज्येष्ठ संचालक सुधीर पगारिया यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी पतसंस्थेचे सचिव विकास पाथरकर, संचालक नरेंद्र श्रोत्री, व्यवस्थापक निलेश लाटे, सरपंच सुखदेव दरेकर, अशोक जगताप, मुकुल गंधे, गौतम कराळे, गजेंद्र सोनवणे आदिसह कर्मचारी उपस्थित होते. प्रास्तविकात सुधीर पगारिया म्हणाले, पंडित दीनदयाळ पतसंस्था स्थापनेपासून एक विचाराने काम करत आहे. त्यामुळे आज प्रगतीच्या क्षेत्रावर पोहचली आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानायुक्त अर्थसेवा देण्याबरोबरच बचतगट, छोटे व्यवसायिक व उद्योजकांनाही पाठबळ देत आहे. पंडित दीनदयाळ उपाध्याय यांचे विचार आम्हा सर्वांना प्रेरणादायी आहेत.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here