दशमीगव्हांच्या सरपंचपदी कांबळे, उपसरपंचपदी काळे - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Thursday, February 11, 2021

दशमीगव्हांच्या सरपंचपदी कांबळे, उपसरपंचपदी काळे

 दशमीगव्हांच्या सरपंचपदी कांबळे, उपसरपंचपदी काळे


नगरी दवंडी/प्रतिनिधी

अहमदनगर ः नगर तालुक्यातील दशमिगव्हाण येथील ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये सरपंचपदी संगीता कांबळे तर उपसरपंचपदी बाबासाहेब काळे यांची निवड करण्यात आली बाबासाहेब काळे हे सलग तिसर्‍यांदा उपसरपंच पदाचे मानकरी ठरले आहेत. दशमीगव्हाण येथील ग्रामपंचायत कार्यालयात मंडलाधिकारी गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवड पार पडली.
   तसेच दशमीगव्हाण विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या चेअरमन पदी बाळासाहेब काळे तर व्हा चेअरमनपदी गंगाधर काळे यांची निवड करण्यात आली.  सर्व नूतन पदाधिकार्‍यांचे ग्रामस्थांच्या वतीने अभिनंदन करण्यात आले यावेळी बोलताना उपसरपंच बाबासाहेब काळे म्हणाले की गावकर्‍यांनी जबाबदारी आमच्यावर सोपवली आहे ती जबाबदारी आम्ही पूर्ण कर्तव्य निष्ठेने पार पाडू त्याचबरोबर गावातील नागरिकांच्या हितासाठी नेहमीच प्रयत्नशील राहू असे मत व्यक्त केले  यावेळी माजी सरपंच भाऊसाहेब काळे, पोपट काळे, जयसिंग काळे, उद्धव कांबळे, ग्रामसेवक शेळके ,बाळासाहेब काळे,आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here