मार्केटयार्ड मेनगेट शिवसेनेकडून खुले ! - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Thursday, February 4, 2021

मार्केटयार्ड मेनगेट शिवसेनेकडून खुले !

 मार्केटयार्ड मेनगेट शिवसेनेकडून खुले !


नगरी दवंडी/प्रिंतनिधी

अहमदनगर ः 2018 मध्ये जिल्हा रस्ता सुरक्षा समितीच्या बैठकीत कृषी उत्पन्न बाजार समितीत बंद करण्यात आले होत. या बंद गेट मुळे व्यापारी व शेतकर्‍यांची अडचण होत असल्याकारणाने खासदार सदाशिव लोखंडे यांनी बैठक घेऊन हे गेट उघडण्याच्या सूचना केल्या असताना याची दखल घेतली गेली नाही. त्यामुळे आज शिवसेनेने घोषणा देत आंदोलन करून कुलूप तोडून हे गेट वाहतुकीसाठी खुले केले आहे.
   गेले कित्येक दिवसापासून बाजारसमितीचे एका बाजूने गेट बंद केले होते या बंद प्रवेशव्दारामुळे व्यापार्‍यांना, शेतकर्‍यांना अडचण निर्माण होत होती. अनेक दिवसापासून व्यापारी व शेतकर्‍यांची मागणी होती की बंद केलेले गेट उघडावे,जेणेकरून वाहतुकीला अडथळा होणार नाही परंतू यात व्यापार्‍यांना यश आले नाही शेवटी शिवसेनेने यात  सहभाग घेतला जिल्हाधिकार्‍यांना सांगून रस्ते सुरक्षा समिती तसेच ज्येष्ठ खासदार सदाशिव लोखंडे यांना सांगितले त्यांनी मिटींग घेतली हे गेट तातडीने उघडण्यात यावे त्यांनी संबंधितांना आदेश केले.संबंधितांनी आदेशाला केराची टोपली दाखविली म्हणून शिवसैनिकांनी  हे कुलुप तोडून गेट उघडलेले आहे. जिथे जिथे व्यापारी शेतकरी अन्याय अडचणी तसेच बाजारसमितीकडून त्रास देण्यात येईल तिथे शिवसेना खंबीरपणे उभी राहील. असा इशारा शिवसेना शहर प्रमुख दिलीप सातपुते यांनी दिला. यावेळी भगवान फुलसौंदर व व्यापारी आपले मनोगत व्यक्त केले.
   मार्केटयार्ड परीसरातील कृषी उत्पन्न बाजारसमितीचे प्रवेशव्दार शिवसेनेने उघडले यावेळी शहरप्रमुख दिलीप सातपुते, प्रथम महापौर भगवान फुलसौंदर, शिवसेना युवा नेते विक्रम राठोड, बाळासाहेब बोराटे, परेश लोखंडे, अमोल येवले, विशाल वालकर, मदन आढाव, संतोष गेनप्पा, मनिष गुगळे, सचिन शिंदे आदीसह शिवसैनिक उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here