रोटरी मिडटाऊनच्या डायलिसिस सेंटरचे रविवारी लोकार्पण ः झावरे - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Tuesday, February 2, 2021

रोटरी मिडटाऊनच्या डायलिसिस सेंटरचे रविवारी लोकार्पण ः झावरे

 रोटरी मिडटाऊनच्या डायलिसिस सेंटरचे रविवारी लोकार्पण ः झावरे

नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः येथील सामाजिक कार्यात अग्रेसर असणार्‍या रोटरी क्लब ऑफ अहमदनगर मिडटाऊनच्या वतीने ग्लोबल ग्रँट च्या माध्यमातून मॅककेअर हॉस्पिटल येथे अत्याधुनिक मशिनरी युक्त डायलिसिस सेंटर ची उभारणी केली गेली आहे. रविवार दि. 7 फेब्रुवारी रोजी या सेंटरचा लोकार्पण सोहळा होणार असल्याची माहिती क्लबचे अध्यक्ष क्षितिज झावरे यांनी दिली.
   रोटरी कोविड केअर सेंटर नंतर नगर शहरासाठी डायलिसिस सेंटर ची उभारणी म्हणजे ‘शहराच्या सेवेत रोटरी’  हे वाक्य पुन्हा एकदा अधोरेखित होत आहे.द रोटरी फाउंडेशननेच्यातून उभे राहिलेल्या या उपक्रमास रोटरी क्लब ऑफ मियामी या अमेरिकेतील क्लब कडून अर्थ सहाय्य झाले आहे. अनेक रोटरी सभासदांनी या प्रोजेक्ट साठी सहकार्य केले आहे. या डायलिसिस सेंटरच्या माध्यमातून नगर शहरातील आणि जिल्ह्यातील अनेक गरजू रुग्णांना विनामूल्य तथा अत्यल्प दरात डायलिसिस उपचाराची सुविधा मॅक केअर हॉस्पिटल येथे करण्यात येणार असल्याची माहिती डॉ. आनंद काशीद यांनी दिली.डायलिसिस ही सातत्याने करावी लागणारी उपचार पद्धती असल्याने सर्वसामान्य रुग्णांना आर्थिक दृष्ट्या न परवडणारी आहे. म्हणूनच रोटरीने हे सेंटर उभे करून रुग्णांना सुविधा उपलब्ध करून देत असल्याची माहिती माजी प्रांतपाल प्रमोद पारीख यांनी दिली.रविवारी दिनांक 7 फेब्रुवारी रोजी रोटरी इंटरनॅशनल डायरेक्टर डॉ. महेश कोटबागी आणि प्रांतपाल हरीश मोटवानी यांच्या हस्ते व अनेक रोटरी सभासदांच्या उपस्थितीत मॅक केअर हॉस्पिटल येथे हा लोकार्पण सोहळा होणार असल्याची माहिती विजय इंगळे यांनी दिली आहे.तरी आपल्या नगर शहरातील, जिल्ह्यातील गरजू रुग्णांनी या सेवेचा लाभ घ्यावा आणि अधिक माहितीसाठी खालील नंबर वर संपर्क साधावा (8459495895) असे आवाहन सचिव दिगंबर रोकडे यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here