‘हॉटेल पॅराडाईज’ नवा थाट व नव्या रुपात ग्राहकसेवेत रूजू - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Saturday, February 13, 2021

‘हॉटेल पॅराडाईज’ नवा थाट व नव्या रुपात ग्राहकसेवेत रूजू

 ‘हॉटेल पॅराडाईज’ नवा थाट व नव्या रुपात ग्राहकसेवेत रूजू

नगरमध्ये हॉटेलिंगचा काळानुरूप अनोखा आविष्कार

नगरी दवंडी/प्रिंतनिधी

अहमदनगर ः गेल्या दोन दशकांपासून ग्राहकांना आलिशान वातावरणात अतिशय रूचकर मेन्युचा आस्वाद देणार्या न्यू टिळक रोडवरील हॉटेल पॅराडाईज नव्या थाटात व नव्या रुपात खवय्यांच्या सेवेत दाखल झाले आहे. परदेशातील रेस्टॉरंटसारखा मॉडर्न  लुक, फॅमिलीसाठी स्वतंत्र व प्रशस्त व्यवस्था, आरामदायी बैठक व्यवस्था आणि जोडीला देशविदेशातील स्वादिष्ट मेन्यूची रेलचेल नव्या रुपातील हॉटेल पॅराडाईजमध्ये उपलब्ध आहे. याशिवाय वायफाय व इतर अत्याधुनिक सोयीसुविधांनी सुसज्ज रूम्सही राजेशाही आदरातिथ्य व वास्तव्याचा अनुभव देण्यास सज्ज आहेत, अशी माहिती संजय जाधव यांनी दिली.
हेमंत जाधव यांनी सांगितले की, ग्राहकांचे प्रेम व प्रतिसाद यामुळे हॉटेल पॅराडाईजला आधुनिक नंदनवनाप्रमाणे नव्या साजात  सेवेत रूजू केले आहे. जगभरातील विविध देशांतील रेस्टॉरंट, हॉटेलमधील आकर्षक लूक सर्वांना प्रचंड आवडतो. त्याचधर्तीवर पॅराडाईजमध्ये अतिशय सुंदर व पाहताक्षणीच भुरळ घालेल असे इंटेरियर व बैठक व्यवस्था करण्यात आली आहे. याशिवाय फॅमिलीसाठी स्वतंत्र एंट्रन्ससह प्रशस्त बैठक व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे परिवारासह खर्याखुर्या पॅराडाईजमध्ये भोजनाचा आस्वाद घेण्याचा आनंद सर्वांना मिळेल. याशिवाय फॅमिली टेरेस गार्डन, ओपन एअर गार्डन रेस्टॉरंट निसर्गाच्या सान्निध्यात गप्पांची मैफल रंगवत जेवण करण्याचा वेगळाच आनंद देणारे आहे. पॅराडाईजमध्ये वरच्या मजल्यावर मिटिंग तसेच किटी पार्टी हॉलचीही अतिशय सुंदर व्यवस्था आहे. याठिकाणी लहान मोठे गेट टुगेदर, बर्थ डे पार्टी, कॉन्फरन्स अशी सर्व व्यवस्था आहे. त्यामुळे प्रत्येकाला जेवणच नाही तर एक संस्मरणीय अनुभव मिळेल.
    राज जाधव यांनी सांगितले की, पॅराडाईज हॉटेल सुरुवातीपासून रसना तृप्त करणार्‍या स्वादमय सेवेसाठी नावाजले जाते. हीच रूचकर सेवा नव्या रुपातील हॉटेलमध्येही कायम ठेवताना देश विदेशातील मेन्यू उपलब्ध करून दिला आहे. यात इंडियन, कॉन्टिनेंटल, महाराष्ट्रीयन, पंजाबी, चायनीज, साऊथ इंडियन मेन्यू आहे.  साऊथ इंडियनमध्ये कांजीवरम इडली, रवा डोसा, म्हैसूर मसाला डोसा दाक्षिणात्य पदार्थांचा ओरिजनल स्वाद देणारा आहे. याशिवाय फास्ट फूड, स्टार्टरचीही मोठी रेलचेल आहे. व्हेज नॉनव्हेजसाठी स्वतंत्र, प्रशस्त व पूर्णत: हायजेनिक किचन असल्याने ग्राहक बिनदिक्कतपणे आपल्या आवडीनुसार ऑर्डर देवू शकतील. व्हेजमध्ये उंबर हंडी, व्हेज दहीवाला, व्हेज मराठा या पॅराडाईजच्या स्पेशालिटीसह अन्य पदार्थांचा आस्वाद सर्वांना घेता येईल. नॉन व्हेजमध्ये नवाबी तसेच मोगलाई डिशेस, हैदराबादी बिर्याणी, दम बिर्याणी, बॉर्बेक्यु कबाब येथे आहे. पॅराडाईजमध्ये वेळोवेळी खास फूड फेस्टिवलचेही आयोजन केले जाणार आहे. खवय्येगिरी साठी हा एक वेगळा अनुभव असेल.
      शहराच्या मध्यवर्ती भागात प्रसन्नचित्त वातावरणात सर्वांना एकत्र भोजनाचा आनंद देण्याच्या दृष्टीने संपूर्ण हॉटेलमध्ये उत्कृष्ट आदरातिथ्य व खानपान व्यवस्था पॅराडाईजमध्ये आहे. प्रशस्त पार्किंग, गार्डनही असल्याने अतिशय निवांतपणे गप्पांची मैफल रंगवत हॉटेलिंगचा पुरेपुर आनंद याठिकाणी मिळेल. ग्राहकांनी या नव्या ढंगाच्या सेवेचा अवश्य लाभ घ्यावा असे आवाहन नंदनवन उद्योग समूहाच्यावतीने करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here