हिंद सेवा मंडळाच्या प्राथमिक शाळेत ज्ञानेश्वरी पारायणाचा अनोखा सोहळा संपन्न - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Thursday, February 4, 2021

हिंद सेवा मंडळाच्या प्राथमिक शाळेत ज्ञानेश्वरी पारायणाचा अनोखा सोहळा संपन्न

 हिंद सेवा मंडळाच्या प्राथमिक शाळेत ज्ञानेश्वरी पारायणाचा अनोखा सोहळा संपन्न


नगरी दवंडी/प्रिंतनिधी

अहमदनगर ः कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सर्वांमध्ये एक नैराश्य निर्माण झाले होते. नकारात्मक विचारशैली निर्माण झाली होती. त्यामुळे प्रत्येकात चैतन्य निर्माण व्हावे, सकारात्मक विचार वाढीस लागावे या उद्देशाने शाळेचे चेअरमन मधुसूदन सारडा यांच्या प्रेरणेने बागडपट्टी येथील हिंद सेवा मंडळाच्या प्राथमिक शाळेत ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
   सात दिवस चाललेल्या पारायण सोहळ्यात हभप अभंग महाराज व हभप लबडे महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेतील शिक्षक व कर्मचारीवृंद यांनी यात सहभाग नोंदविला. याप्रसंगी मुख्याध्यापक विठ्ठल उरमुडे म्हणाले, सध्या मोबाईलच्या अतिवापरामुळे वाचनाकडे लक्ष कमी होत चालल्याचे दिसून येते. त्यामुळे प्रत्येकाला अनेक समस्याही निर्माण होत आहेत. यासाठी मन:शांती आणि आत्मिक समाधान महत्वाचे ठरते. यासाठीच शाळेत ज्ञानेश्वरी पारायणचा उपक्रम राबवून शिक्षक व कर्मचार्‍यांमध्ये सकारात्मकाता वाढीसाठीचा प्रयत्न यानिमित्ताने केला. याप्रसंगी लबडे महाराज म्हणाले, समाजावर संस्कार करणारे शाळा हे एक केंद्र आहे. या केंद्रातून संस्कारक्षम पिढी निर्माण होत असल्याने शिक्षकांचेही ज्ञानात नियमित भर पडली पाहिजे. ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्यातून ऊर्जा मिळून त्यांच्या व्यक्तीमत्व आणखी प्रगल्भ होईल, असे सांगून उपक्रमाचे कौतुक केले.
   हा सोहळा यशस्वीतेसाठी सौ.अंजली सासवडकर, सौ.अरुणा धाडगे, सौ.गौरी ब्रह्मे, सौ.विद्या पोतदार, सौ.अर्चना देशपांडे, सौ. मनिषा साळी, सौ.मनिषा जंगम, सौ.मच्चा, सौ.अर्चना शिंदे, सौ.दिपाली कोल्हे, पुरुषोत्तम देवळालीकर, मदसीर पठाण, संदिप कळसकर आदिंनी परिश्रम घेतले. या सोहळ्यासाठी शाळेचे चेअरमन मधुसुदन सारडा, प्रा.मकरंद खेर, महासंघाचे मुख्य सचिव कां.ता.तुंगार, शेखर उंडे, सुनिल कुलकर्णी, राघवेंद्र स्वामी विद्यालयाचे शिंदे सर, हिंद सेवा मंडळाचे सहाय्यक सचिव बाळासाहेब कुलकर्णी, हभप कराळे महाराज आदि उपस्थित होते. पसायदानाने पारायणाची सांगता झाली.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here