आरपीआय मध्ये ग्रामपंचायत सदस्य कळकुंभे यांचा प्रवेश - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Thursday, February 25, 2021

आरपीआय मध्ये ग्रामपंचायत सदस्य कळकुंभे यांचा प्रवेश

 आरपीआय मध्ये ग्रामपंचायत सदस्य कळकुंभे यांचा प्रवेश


नगरी दवंडी/प्रिंतनिधी

अहमदनगर ः रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (गवई गट) मध्ये ग्रामपंचायत सदस्य संकेत भाऊसाहेब कळकुंभे यांनी प्रवेश केला. आरपीआयचे शहराध्यक्ष सुशांत म्हस्के यांनी कळकुंभे यांचा पक्षात स्वागत करुन त्यांचा सत्कार केला. यावेळी युवक जिल्हाध्यक्ष पवन भिंगारदिवे, संतोष पाडळे, अल्पसंख्याक शहराध्यक्ष नईम शेख, युवक तालुका अध्यक्ष सचिन शिंदे, शहर संघटक आफताब बागवान, शहर उपाध्यक्ष अरबाज शेख, दिनेश पाडळे आदी उपस्थित होते.
   आवणे खुर्द (ता. शेवगाव) ग्रामपंचायतमध्ये मागील पंधरा वर्षापासून संकेत कळकुंभे ग्रामपंचायत सदस्य आहेत. राजकारणासह समाजकारणात योगदान देऊन त्यांचे सामाजिक कार्य सुरु आहे. पक्षाच्या माध्यमातून कळकुंभे विविध प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याची भावना शहराध्यक्ष सुशांत म्हस्के यांनी व्यक्त केली. सत्काराला उत्तर देताना कळकुंभे यांनी आरपीआयमध्ये सर्व समाजातील युवकांना संधी देण्यात येत असून, समाजात फुले, शाहू, आंबेडकर यांच्या विचाराने कार्य सुरु आहे. पक्षाच्या विचारधारेने प्रभावीत होऊन आरपीआय पक्षात प्रवेश केल्याचे त्यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here