जय हिंद सैनिक सेवा फाऊंडेशनच्या पाठपुराव्याने.. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, February 27, 2021

जय हिंद सैनिक सेवा फाऊंडेशनच्या पाठपुराव्याने..

 जय हिंद सैनिक सेवा फाऊंडेशनच्या पाठपुराव्याने

शेतकर्‍यांच्या खात्यावर नुकसान भरपाईचे पैसे वर्ग; रास्ता रोको आंदोलन स्थगित
नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः नुकसान भरपाई जाहीर होऊन देखील शेतकर्‍याच्या खात्यावर पैसे वर्ग झाले नसल्याने जय हिंद सैनिक सेवा फाऊंडेशनच्या वतीने चिचोंडी (ता. पाथर्डी) येथे रास्ता रोको आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता. या आंदोलनाची दखल घेत तहसिलदार यांनी पाठपुरावा करुन सर्व शेतकर्यांच्या खात्यात नुकसान भरपाईचे पैसे वर्ग केल्याने सदरचा रास्ता रोको आंदोलन मागे घेण्यात आला असल्याची माहिती संघटनेचे अध्यक्ष शिवाजी पालवे यांनी दिली.
   मागच्या वर्षी अवकाळी पाऊस होऊन शेतीचे मोठे नुकसान झाले होते. त्याचे पंचनामे होऊन देखील अनेक शेतकर्‍यांच्या खात्यात पैसे जमा झाले नाही. पाथर्डी तालुक्यातील अनेक गावामधील शेतकरी या भरपाईपासून वंचित होते. पाठपुरावा करुन देखील या भागातील शेतकर्‍यांना नुकसान भरपाई मिळत नसल्याने जय हिंद सैनिक सेवा फाऊंडेशनच्या वतीने पाथर्डी तहसीलदार यांना निवेदन देऊन चिचोंडी येथे रास्ता रोको करण्याचा इशारा देण्यात आला होता. याची दखल घेऊन तहसिलदारांनी पाठपुरावा करुन कोल्हार येथील 238 शेतकरींचे 11 लाख 84 हजार 800 रु., शिराळ येथील 742 शेतकरींसाठी 26 लाख 75 हजार 300 रू., तर शिंगवे केशव येथील 368 शेतकरींसाठी 29 लाख 22 हजार 400 रू शेतकर्यांच्या खात्यावर जमा केले आहेत.

No comments:

Post a Comment