चिचोंडी पाटील येथे गाय गोठा काँक्रिटीकरण कामाचा भूमिपूजन सोहळा संपन्न - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Thursday, February 25, 2021

चिचोंडी पाटील येथे गाय गोठा काँक्रिटीकरण कामाचा भूमिपूजन सोहळा संपन्न

 चिचोंडी पाटील येथे गाय गोठा काँक्रिटीकरण कामाचा भूमिपूजन सोहळा संपन्न


नगरी दवंडी/प्रतिनिधी

अहमदनगर ः नगर ता. पंचायत समितीमार्फत राबविण्यात येणार्‍या गाय गोठा काँक्रिटीकरण कामाचा शुभारंभ जि. प.सदस्य तथा शिवसेना उपजिल्हाप्रमुख संदेश कार्ले यांचे हस्ते चिचोंडी पाटील येथे करण्यात आला.
   यावेळी पं. स.सभापती इंजि. प्रविण कोकाटे यांनी शेतकर्‍यांना पंचायत समितीमार्फत राबविण्यात येणार्‍या विविध वैयक्तिक योजनांची माहिती दिली. म.ग्रा.रो.ह.योजनेअंतर्गत गाय गोठा काँक्रिटीकरण ही योजना राबविण्यात येते.सदर योजनेअंतर्गत नगर तालुक्यामध्ये जवळपास 70 लक्ष रु. इतक्या निधीचे काम होणार आहे .पंचायत समिती मार्फत राबविण्यात येणार्‍या वैयक्तिक लाभाच्या योजनांचा लाभ शेतकर्‍यांनी घ्यावा असे आवाहन सभापती प्रविण कोकाटे यांनी केले.
   नगर जिल्ह्यामध्ये नगर ता.पंचायत समिती उत्कृष्ट काम करत असल्याचे प्रतिपादन जि. प.सदस्य संदेश कार्ले यांनी केले. उदघाटन प्रसंगी  गटविकास अधिकारी सचिन घाडगे,शिवसेना उपतालुकाप्रमुख जिवाजी लगड, शिक्षक नेते आबासाहेब कोकाटे सर,डॉ ययाती फिसके ,सरपंच मनोज कोकाटे, उपसरपंच कल्पना ठोंबरे, मा.उपसभापती दत्तात्रय हजारे ,मा.उपसरपंच डॉ.मारुती ससे, सोसायटी चेअरमन राजेंद्र कोकाटे मा.चेअरमन आर.एस. कोकाटे, राष्ट्रवादी कार्याध्यक्ष अशोक कोकाटे,  अजय कांकरिया, भाऊसाहेब वाडेकर,अरुण दवणे,  ग्रा.प. सदस्य विश्वसागर कोकाटे, संदीप काळे,दीपक हजारे, प्रशांत कांबळे, महादजी कोकाटे, सचिन ठोंबरे,ज्ञानेश्वर ठोंबरे, गणेश वाडेकर, बबनराव शेळके, रामदास कोकाटे, किसनराव आगलावे, ग्राम विकास अधिकारी देविदास मोरे, शाखा अभियंता श्री डेरे, दिपक मेटे, निखिल गायकवाड,अंबादास कोकाटे, राजू तनपुरे,शिवाजी कोकाटे आदींसह लाभार्थी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here