तो म्हणाला.. तुला नोकरी मिळणार नाही.. माझे बरोबर हॉटेलला चल. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Thursday, February 4, 2021

तो म्हणाला.. तुला नोकरी मिळणार नाही.. माझे बरोबर हॉटेलला चल.

 तो म्हणाला.. तुला नोकरी मिळणार नाही.. माझे बरोबर हॉटेलला चल.

अल्पवयीन मुलीची छेडछाड; पोलीस अधीक्षकांनी घेतली दखल
नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः बोल्हेगाव परिसरातील धुणी भांडे करणार्‍या महिलेची अल्पवयीन मुलगी नोकरीसाठी वणवण हिंडत असताना रस्त्यावरील एका इसमाने “तुझे शिक्षण कमी आहे तुला नोकरी मिळणार नाही. माझे बरोबर हॉटेलला चल.. तुला लागले तेवढे पैसे मी देतो” असे सांगून छेड काढली. मुलीचे पालकांनी पोलिस अधीक्षकांची भेट घेऊन हकीकत सांगितल्यानंतर एमआयडीसी पोलिसांना या प्रश्नात लक्ष घालण्याचे आदेश दिले.
    अल्पवयीन मुलीची छेड काढल्या प्रकरणी कुटुंबियांनी एमआयडीसी  पोलिसात धाव घेतली मात्र, तक्रार घेण्यास पोलिसांनी टाळाटाळ केल्याने कुटुुंबातील व्यक्ती यांनी थेट एसपी कार्यालय गाठले येथुन त्याना दिलासा मिळाला आहे.
   सदर घटनेची हकीकत अशी की, बोल्हेगाव परिसरातील धुणी भांड्याची काम करणार्या महिलेच्या अत्पवयीन मुलगी ही काम शोधण्यासाठी एमआयडीसी परिसरातील एका कंपनीत जात होती.  यावेळी त्या अल्पवयीन मुलनी कंपनी कोठे आहे असे एका व्यक्तीला विचारले त्यांनी जो पत्ता दिला त्या रस्त्याने जात असताना त्या मुलीला रस्ता सापडला नाही, ती पुन्हा घराकडे निघाली असता एका इसमाने तीला बोलावले यावर मुलीनी मला काही नोकरी मिळेल का विचारना केली. यावर त्या इसमाने तुझे शिक्षण काय विचारले असता मी त्यांना आठवी पर्यंत असल्याचे सांगितले. यावर त्या इसमाने मुलीलस म्हंटले की, कमीत कमी 10 वी पास नोकरीसाठी लागते.
      यानंतर त्या मुलीला तो इसम म्हणाला की, तुला नोकरी लागणार नाही, तुला जेवढे पैसे लागतात तेवढे मी देतो तु माझ्या सोबत चल हॉटेलमध्ये, त्यावेळेस सदर इसमाने काही अंतर गेल्यावर मुलीने मानलेल्या भावाला फोन करुन सांगीतले. यानंतर भावाला मुलीनी सांगितले की, तु आईला घेऊन अमुल ठिकाणी ये यावर 10ते15 मिनटात आई व भाऊ आले. त्यांना मुलीने सर्व प्रकार कथीत केला. यानंतर एमआयडीसी पोलिसात मुलगी व कुटुंबिय गेले, तेथुन त्यांनी सांगितल्याप्रमाणे त्या इसमाला पोलीस ठाण्यात आनले मात्र, त्याची मावशी आल्यावर त्या मावशीने शिवीगाळ केली. यानंतर पोलिसांनी तुम्ही काही वेळ थांबा साहेब येत आहे असे म्हंटले, 3 तासापर्यंतही कोणी आले नाही. यानंतर साहेब न आल्याने दुसर्या साहेबांकडे नेले असता त्यांनी उद्या तुम्हाला बोलावतो असे म्हंटले. पोलिस बोलावतील असे आम्हाला वाटले मात्र अद्यापर्यंत पोलिसांनी बोलावले नाही असे पोलिसा अधिक्षकांना दिलेल्या तक्रार अर्जात म्हंटले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here