कुमारी सोनल भळगटिया, पहिल्याच प्रयत्नात सी.ए. परिक्षा उत्तीर्ण
नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः गणेशनगर या ग्रामीण परिसरातील प्रतिष्ठित व्यापारी व जैन श्रावक संघाचे सामाजिक कार्यकर्ते श्री.भिकचंद भळगटिया यांची कन्या कुमारी सोनल ही नुकत्याच झालेल्या सी.ए परिक्षेत पहिल्याच प्रयत्नात उत्तम गुणांनी यशस्वी झाली. सोनलने श्रीरामपुर येथे प्रथम श्रेणीत बारावी उत्तीण होवून, पुणे येथील सिम्बॉयसीस मध्ये बी.कॉम पुर्ण केले व बी स्मार्ट अॅण्ड असोसिएटस यांचे कुशल मार्गदर्शनाखाली आपली आर्टीकलशीप यशस्वी केली. गणेशनगर राहाता परिसरातील सर्व जैन श्रावक सदस्य, आप्त, नगर येथील स्नेही परिवाराकडुन सोनलचे अभिनंदन होत आहे. आपल्या या यशात आई-वडील व बंधुतुल्य शिक्षकांचे मौलिक योगदान लाभल्याचे सोनलने सांगितले.
No comments:
Post a Comment