रस्त्याच्या कामाचा दर्जा तपासणी सुरू शहर अभियंता सुरेश इथापेची मोहीम - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, February 2, 2021

रस्त्याच्या कामाचा दर्जा तपासणी सुरू शहर अभियंता सुरेश इथापेची मोहीम

 रस्त्याच्या कामाचा दर्जा तपासणी सुरू शहर अभियंता सुरेश इथापेची  मोहीम


अहमदनगर ः
शहरातील रस्त्यांचा प्रश्न नेहमी ऐरणीवर आलेला आहे. त्यामुळे डांबरी रस्त्यांची कामे दर्जेदार व्हावीत, यासाठी मटेरियल व डांबराचे टेस्टिंग घेण्यास मनपाने आजपासून सुरुवात केली आहे. शहरातील डांबरी रस्ते वर्ष, दोन वर्षात उघडण्याचे प्रकार घडले आहेत. तसेच एकाच पावसात रस्ता वाहून गेल्याच्या देखील घटना घडल्या आहेत. त्यामुळे शहरातील रस्ते खड्डेमय होत आहेत.रस्त्याबाबत मनपा प्रशासनाकडे अनेकदा तक्रारी दाखल झालेल्या आहेत. रस्त्यांची कामे दर्जेदार व्हावीत, यासाठी रस्त्याचे मटेरियल व आंध्राचे नमुने घेऊन त्याचा दर्जा तपासणीसाठी मनपाकडून अट्रॅक्टर मशीन कार्यान्वित करण्यात आले आहे. त्यामुळे ठेकेदारांना देखील चाप बसणार आहे. काल सकाळी शहरातील चार, पाच रस्त्यांच्या मटेरियल चे व डांबराचे नमुने घेण्यात आले. शहर अभियंता सुरेश इथापे, उपअभियंता मनोज पारखे, शाखा अभियंता श्रीकांत निंबाळकर आदी या वेळी उपस्थित होते.शहर व उपनगरात सध्या सात ते आठ ठिकाणी डांबरी रस्त्याची कामे सुरू आहेत. या सर्व रस्त्यांचा कामाचा या मशीन द्वारे दर्जा तपासला जाणार आहे.

No comments:

Post a Comment