मुकुंदनगर येथील अशरफुल बनात मदरसेमध्ये मुस्लिम समाजातील वधू-वर परिचय मेळावा संपन्न - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Tuesday, February 2, 2021

मुकुंदनगर येथील अशरफुल बनात मदरसेमध्ये मुस्लिम समाजातील वधू-वर परिचय मेळावा संपन्न

 मुकुंदनगर येथील अशरफुल बनात मदरसेमध्ये मुस्लिम समाजातील वधू-वर परिचय मेळावा संपन्न

अहमदनगर :  मुकुंदनगर येथील अशरफउल वनात मदरसेमध्ये रविवार, दि. 31 जानेवारी रोजी फराश फौंडेशन, पुणे व मौलाना आजाद विचार मंच, अहमदनगर यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित मुस्लिम समाजातील वधु-वर परिचय मेळाव्याचे (रिश्तों का जलसा) आयोजन करण्यात आले होते. मेळाव्याची सुरुवात मौलाना अब्दुल रहूफ यांनी कुराण पठण करून केली. मेळाव्याचे अध्यक्षस्थान ज्येष्ठ नगरसेवक-अहमदनगर म.न.पा. तथा एटीयू चांद सुलताना हायस्कुल व ज्युनिअर कॉलेजचे चेअरमन शेख हाजी नजीर अहमद ऊर्फ नज्जू पहेलवान यांनी भूषविले. प्रमुख पाहुणे म्हणून अ‍ॅडव्होकेट शेख फारूक बिलाल, अमजतभाई दंडोती, माजी समाजकल्याण अधिकारी रफिक मुन्शी, काँग्रेसचे जिल्हा सचिव उबेदभाई शेख हे उपस्थित होते.  मेळाव्याचे सुत्रसंचालन मौलाना आजाद विचार मंचचे कय्युमभाई हुंडेकरी यांनी केले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here