शेतकर्‍यांना न्याय देणार्‍या डॉ. दिघावकरांचा स्नेहबंधतर्फे गौरव - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Thursday, February 18, 2021

शेतकर्‍यांना न्याय देणार्‍या डॉ. दिघावकरांचा स्नेहबंधतर्फे गौरव

 शेतकर्‍यांना न्याय देणार्‍या डॉ. दिघावकरांचा स्नेहबंधतर्फे गौरव 

व्यापार्‍यांकडून शेतकर्‍यांना मिळवून दिला 120 कोटींचा मोबदला

नगरी दवंडी/प्रतिनिधी

अहमदनगर ः पिके खरेदी करून त्यांचा मोबदला न देणार्‍या व्यापार्‍यांकडून शेतकर्‍यांना  जवळपास 120 कोटी रुपये मोबदला मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावणार्‍या विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. प्रताप दिघावकर यांचा स्नेहबंध फौंडेशन च्या वतीने पदक सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला.
   विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. दिघावकर यांनी पोलीस दलात केलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल तसेच शेतकर्‍यांना न्याय दिल्याबद्दल त्यांचा स्नेहबंध चे अध्यक्ष उद्धव शिंदे यांनी हा सत्कार नगरमध्ये केला.
याप्रसंगी पोलिस अधीक्षक मनोज पाटील, अप्पर पोलिस अधीक्षक सौरभ अग्रवाल, अमित खामकर, प्रसाद कुलकर्णी, आकाश निर्‍हाळी, हेमंत ढाकेफळकर, कार्तिक स्वामी आदी उपस्थित होते.डॉ. दिघावकर यांनी नाशिकचा पदभार घेतल्यानंतर नाशिकच्या गुन्हेगारीचे प्रमाण कमी झाले आहे. शेतकर्‍यांसाठी काटेकोरपणे निर्णयाची अंमलबजावणी करून शेतकर्‍यांना न्याय मिळवून दिला.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here