मोहटादेवी मंदिर सोने प्रकरण.. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, February 13, 2021

मोहटादेवी मंदिर सोने प्रकरण..

 मोहटादेवी मंदिर सोने प्रकरण..

दोन आरोपींना 17 फेब्रु.पर्यंत पोलीस कोठडी.
नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील मोहाटा येथे अंधश्रद्धेतून मोहटादेवी मंदिरात सोने पुरल्याप्रकरणी औरंगाबाद खंडपीठाच्या आदेशानुसार पाथर्डी पोलीस ठाण्यात विश्वस्तांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
   दरम्यान या गुन्ह्यात तपासी अधिकारी तथा पोलीस उपअधीक्षक सुदर्शन मुंडे यांनी काल सोलापूर येथील पंडित प्रदीप जाधव व मोहटादेवी स्ट्रस्टचा तत्कालीन विश्वस्त संदीप पालवे यांना अटक केली. या दोघांना दुपारी न्यायालयात हजर करण्यात आले होते.न्यायालयात सरकारी पक्षाच्यावतीने ड. शिवाजी दराडे यांनी बाजू मांडत आरोपींना जास्तीतजास्त पोलीस कोठडी देण्याची मागणी केली.सरकारी पक्ष व आरोपी पक्षाच्यावतीने युक्तिवाद झाल्यानंतर न्यायाधीश अस्मिता वानखेडे यांनी या दोघांना 17 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. दरम्यान या गुन्ह्यात इतर आरोपींचाही शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

No comments:

Post a Comment