गुलमोहर रस्ता काँक्रिटीकरणास शासनाकडून निधी मिळणार- आ. जगताप - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, February 4, 2021

गुलमोहर रस्ता काँक्रिटीकरणास शासनाकडून निधी मिळणार- आ. जगताप

 गुलमोहर रस्ता काँक्रिटीकरणास शासनाकडून निधी मिळणार- आ. जगताप


नगरी दवंडी/प्रिंतनिधी

अहमदनगर ः वेगाने विकसित होत असलेल्या सावेडी उपनगराची विशेष ओळख म्हणून गुलमोहोर रोड प्रसिद्ध आहे. गुलमोहोर रस्त्यामुळे या परिसराची विकसित व मॉडेल परिसर म्हणून ओळख निर्माण झालेली आहे. आता या रस्त्याचा आधुनिक पद्धतीने विकास व सुशोभिकरण करण्यासाठी राज्य शासनाकडे निधीसाठी पाठपुरावा सुरू असून, शहरातील सर्व प्रमुख रस्ते हे प्रशस्त करण्यासाठी काँक्रिटीकरण, साईड गटार, फुटपाथ, डिव्हाईडर याचबरोबर रस्ता रूंदीकरणात अडथळे ठरणारे विजेचे खांब स्थलांतरित करुन त्या भागातील विजेच्या तारा भूमिगत करणे आदी कामांचे प्रस्ताव मंजुरीसाठी शासनाकडे सादर करण्यात आलेले असून यापैकी गुलमोहोर रस्ता विकासासाठी लवकरच निधी प्राप्त माहिती होणार असलयाचे प्रतिपादन आ. संग्राम जगताप यांनी केले.
   यावेळी बोलताना आ. जगताप म्हणाले की, बालिकाश्रम रस्ता (महात्मा फुले रस्ता व कोठी रस्त्यासारखे) काँक्रिटचे रस्ते शहरामध्ये निर्माण करायचे आहे. या दृष्टिकोनातून काम सुरु आहे. गुलमोहोर रोड हा उपनगरातील महत्त्वाचा रस्ता असून याच्या विकासामुळे परिसरास विशेष नावलौकिक प्राप्त होणार आहे. सद्यस्थितीत यंदाच्या पावसामुळे रस्त्याची दुरावस्था झाली आहे. नवीन कामास सुरुवात होण्यापूर्वी नागरीकांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन या रस्त्याचे दुरुस्तीचे काम तातडीने हाती घेण्यात आले असल्याचे ते म्हणाले.
    कुष्ठधाम चौक ते महाराजा हॉटेल दरम्यानच्या गुलमोहोर रस्त्याची पाहणी करुन पॅचिंगच्या कामाला सुरुवात करण्यात आली. यावेळी आ. संग्राम जगताप, नगरसेवक स्वप्निल शिंदे, मा. नगरसेवक अजिंक्य बोरकर, उद्योजक अमोल गाडे, राष्ट्रवादीचे विधानसभा अध्यक्ष सुमित कुलकर्णी, सचिन जगताप,ओंकार देशमुख, शहर अभियंता सुरेश इथापे, पाणी पुरवठा विभागप्रमुख रोहिदास सातपुते, इंजि. मनोज पारखे आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment