जिल्हा रुग्णालय येथे अखिल महाराष्ट्र सफाई कर्मचारी संघटनेची शाखा स्थापन - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Saturday, February 6, 2021

जिल्हा रुग्णालय येथे अखिल महाराष्ट्र सफाई कर्मचारी संघटनेची शाखा स्थापन

 जिल्हा रुग्णालय येथे अखिल महाराष्ट्र सफाई कर्मचारी संघटनेची शाखा स्थापन

सफाई कर्मचार्‍यांचे प्रश्न सोडविण्यासाठी पाठपुरावा करणार- गोपाल चव्हाण

नगरी दवंडी/प्रिंतनिधी

अहमदनगर ः सफाई कर्मचारी करीत असलेले काम हे खर्या अर्थाने पुण्याचे काम आहे. ते करीत असलेल्या कामामुळे परिसराची स्वच्छता राहून त्यामुळे अनेकजण आजारापासून दूर राहतात. नगरच्या मागील 30 वर्षांत प्रथमच अखिल महाराष्ट्र सफाई कर्मचारी संघटनेच्या रूपाने शाखा स्थापन होत आहे. ही संघटना राज्यभर कार्यरत असून, या संघटनेच्या माध्यमातून सफाई कर्मचार्‍यांचे प्रश्न सोडविण्याचे काम केले जाते. शासन दरबारी प्रश्न मांडून ते सोडविले जातात. कोणावर अन्याय होत असेल, तर त्यांना न्याय मिळवून दिला जातो. संघटनेचे राज्य अध्यक्ष नागेश कंडारे व राज्य उपाध्यक्ष धनराज पिवाल यांच्या माध्यमातून सफाई कर्मचार्‍यांच्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी राज्य शासनाकडे पाठपुरावा करू, असे प्रतिपादन नगर शाखाध्यक्ष गोपाल चव्हाण यांनी केले.
   अखिल महाराष्ट्र सफाई कर्मचारी संघटनेच्या शाखेची जिल्हा रुग्णालय येथे स्थापना करण्यात आली. यावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष तानसेन बिवाल, शाखाध्यक्ष गोपाल चव्हाण, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुनील पोखरणा, संतोष छजलाने, सचिन बैद, नितीन बागडे, हरिश छजलाने, अनिल नरवाल, रोहित नरवाल, शुभम टाक, सुधीर तेजी, रोहित घावरी, गौरव संघोलिया, सचिन यादव, संतोष बैद, सागर शेंडगे, दत्तात्रय आनंदकर, बाळासाहेब क्षीरसागर, सुरेश छजलाने, सुमित डुलगण, आशिष हंस आदी उपस्थित होते.श्री. चव्हाण पुढे म्हणाले की, माझी 30 वर्षे सेवा झाली असून, या काळात अनेक चांगले वाईट अनुभव मला आहे. प्रथमच सफार्ई कर्मचार्यांसाठी काम करणार्या संघटनेची स्थापन होत असून, याचा मनोमन आनंद आहे. कारण आता आपले प्रश्न सोडवून घेण्यासाठी हक्काचे ठिकाण मिळणार आहे. आपण शासकीय कर्मचारी आहोत, याचे भान प्रत्येकाने ठेवून जनतेची सेवा करावी. आपण करत असलेली सेवा खर्या अर्थाने ईश्वर सेवाच आहे. संघटनेच्या माध्यमातून प्रत्येकाला न्याय मिळवून दिला जाईल, असे ते म्हणाले.
जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुनील पोखरणा यांनी सफाई कर्मचारी संघटना स्थापनेबद्दल समाधान व्यक्त केले. ते म्हणाले की, सर्वांनी बरोबर राहून एकत्रितपणे काम केल्यास अनेक प्रश्न सुटण्यास मदत होते. गोपाल चव्हाण यांचे काम चांगले असून, ते आपल्या कार्यकुशलतेने काम करून निश्चितच आपल्या कामाचा ठसा उमटवतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला, तसेच संघटनेमुळे सफाई कामगारांचे प्रश्न सुटतील, असे सांगितले. जिल्हाध्यक्ष तानसेन बिवाल म्हणाले की, अखिल महाराष्ट्र सफाई कर्मचारी संघटनेने राज्यभर आपल्या कामातून ठसा उमटवला आहे. प्रामाणिकपणे सफाई कर्मचार्यांच्या प्रश्नी आवाज उठविला आहे. प्रसंगी आंदोलने करून प्रश्न सोडविले आहेत. नगरला शाखा स्थापन झाली असून, या शाखेच्या माध्यमातून निश्चितच तुमचे प्रलंबित प्रश्न सुटतील, असे सांगितले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here