नागरदेवळे येथील महसूल विजय सप्तपदी अभियानात 14 लाखाची वसुली - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Saturday, February 27, 2021

नागरदेवळे येथील महसूल विजय सप्तपदी अभियानात 14 लाखाची वसुली

 नागरदेवळे येथील  महसूल विजय सप्तपदी अभियानात 14 लाखाची वसुली

15 लाभार्थीना आदेशाचे वाटप

नगरी दवंडी/प्रतिनिधी

अहमदनगर ः महसूल व वनविभाग ,अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय अंतर्गत महसूल मंत्री बाळासाहेब थोरात ,  जिल्हाधिकारी  डॉ.राजेंद्र भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली नगर तालुक्यातील नागरदेवळे येथे महसूल विजय सप्तपदी अभियान नगर तालुका तहसीलदार उमेश पाटील  व मान्यवर तसेच  लाभार्थीं यांच्या उपस्थितीत घेण्यात आले .यावेळी 15 लाभार्थीं यांना तुकडा नियमितीकरण आदेश वाटप करण्यात आले .यामध्ये 14 लाखाची वसुली करण्यात आली.व पोटखराबा लागवडीखाली आणण्याची 45 प्रकरणे तयार करण्यात आली .यावेळी तहसीलदार पाटील यांच्याहस्ते  भाजप युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष सय्यद मुजाहिद  यांचा  सन्मान करण्यात आला .यावेळी लाभार्थींनी अधिकारी यांचे या उपक्रमाबाबत आभार मानले .
अभियान यशस्वीतेसाठी अप्पर तहसीलदार श्रीमती साबळे ,नायब तहसीलदार शिल्पा पाटील ,भिंगार मंडलाधिकारी संतोष झाडे , नागरदेवळे सरपंच राम पानमळकर,भाजप युवा मोर्चा अल्पसंख्याक विभागाचे जिल्हाध्यक्ष सययद मुजाहिद यांनी प्रयत्न केले .यावेळी पंचायत समिती सदस्य राहुल पानसरे ,माउली शिंदे ,भिंगार तलाठी आबासाहेब पवार, नागरदेवळे तलाठी नितीन घाटेशाही ,व कोतवाल प्रभाकर  गोधळे व लाभार्थी , ग्रामस्थ उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here