भातोडीत राज्यस्तरीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Tuesday, February 2, 2021

भातोडीत राज्यस्तरीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन

 भातोडीत राज्यस्तरीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन


नगरी दवंडी/प्रतिनिधी

अहमदनगर ः नगर तालुक्यातील भातोडी (पारगाव) येथे दि. 3 फेब्रुवारी रोजी राज्यस्तरीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
   स्पर्धेत प्रथम पारितोषिक- रू.31111, द्वितीय- रू.25555 व तृतीय रू.15555 असे अनुक्रमे तीन बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. तरी जिल्ह्यातील व राज्यातील क्रिकेटप्रेमींनी या स्पर्धेत सहभागी व्हावे असे आवाहन संघर्ष मित्र मंडळाचे अध्यक्ष प्रविण लबडे यांनी केले.
   यावेळी संयोजक टीमचे प्रतिनिधी आदिनाथ शिंदे, दत्ता कदम, राजु काळे आदी उपस्थित होते. लबडे म्हणाले की, भातोडी येथे सालाबादप्रमाणे याही वर्षी क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केले आहे.
संघर्ष मित्र मंडळ आयोजित क्रिकेटप्रेमींसाठी नृसिह चषक ठेवण्यात आला आहे. स्पर्धेचे उद्घाटन 3 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 वाजता होणार आहे.
   यावेळी नगर तालुका पंचायत समितीचे सभापती प्रवीण कोकाटे, भाजपा तालुका अध्यक्ष मनोज कोकाटे, पारेवाडीचे सरपंच राहुल शिंदे, कांद्या व्यापारी विजयकुमार बोरुडे,  सामाजिक कार्यकर्ते राजेश परकाळे, माजी सरपंच बबनराव घोलप, चेअरमन विश्वनाथ कदम, उपसरपंच राजू पटेल, शंभूराजे हॉटेलचे मालक श्रीकांत काळे, शिवसेना तालुका उपप्रमुख निसार शेख, नृसिंह कृषी सेवा केंद्राचे प्रमुख साहेबराव आघाव, भाजपा नेते अल्ताफभाई पटेल, आशीर्वाद हॉटेलचे मालक सुनील थोरात, महाराजा हॉटेलचे मालक गणेश आठरे,    ग्रामसेवक अविनाश झाम्बरे, शिक्षक नेते कैलास दहातोंडे या मान्यवरांच्या हस्ते स्पर्धेचे उदघाटन होणार आहे.
   गतवर्षी राज्यभरातून 90 संघांनी सहभाग नोंदवला होता. याही वर्षी मोठ्या प्रमाणात क्रिकेट प्रेमीनी स्पर्धेत सहभाग नोंदविण्याचे आवाहन संयोजक टीमने केले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here