संत रविदास महाराज यांचे कार्य सदैव प्रेरणादायी : सभापती उमेश परहर - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Saturday, February 27, 2021

संत रविदास महाराज यांचे कार्य सदैव प्रेरणादायी : सभापती उमेश परहर

 संत रविदास महाराज यांचे कार्य सदैव प्रेरणादायी : सभापती उमेश परहर


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः
समता, बंधुता व एकात्मता या विचारांतून समाजाला दिशा देणारे महान संत रविदास महाराज यांचे कार्य सदैव प्रेरणादायी आहे. अनेक वर्षांपूर्वी समाजात असलेली अंधश्रध्दा दूर करून त्यांनी समाजाला नवे विचार दिले. भजन, किर्तन, प्रवचनाच्या माध्यमातून समाजातील चुकीच्या प्रथा, परंपरावर प्रहार केले. भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरही संत रविदास महाराज यांच्या विचारांचा मोठा प्रभाव राहिला. डा.आंबेडकर यांनी आपला द अनटचेबल हा ग्रंथही संत रविदास यांनाच समर्पित केला. राज्य शासनाने संत रविदास महाराज यांची शासकीय जयंती साजरी करण्याचा स्तुत्य निर्णय घेतला आहे, असे प्रतिपादन जि.प.समाजकल्याण समितीचे सभापती उमेश परहर यांनी केले.
   राज्य शासनाच्या निर्देशानुसार यंदा प्रथमच संत रविदास महाराज यांची जयंती शासकीय पातळीवर साजरी होत आहे. यानिमित्त जिल्हा परिषदेत संत रविदास महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन सभापती परहर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव सोळंके, शिक्षणाधिकारी प्रा.गुलाब सय्यद, सहदेव निंभोरे, समाजकल्याण अधिकारी देवीदास कोकाटे, प्रमोद साळवे, शशिकांत रासकर आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here