श्रीगोंदा तालुक्यातील कोकणगाव शिवारात 4 मोरांचा मृत्यु
श्रीगोंदा - श्रीगोंदा तालुक्यातील कोकणगाव शिवारात उल्हास दिनकर शिंदे यांच्या शेतात चार मोर मृत अवस्थेत आढळल्याने मोठी खळबळ उडाली आहे.
तालुक्यांतील कोकणगाव, आढळगाव परिसरात मोराची संख्या मोठी आहे. अलिकडच्या काळात ओढ्या नाल्यावर अतिक्रमण वाढले असून, झाडे झुडपे कमी झाल्याने मोरांची प्रजाती नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. अशा परिस्थितीत कोकणगाव शिवारात उल्हास दिनकर शिंदे यांच्या शेतात चार मोराचा मृत्यू झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती समजताच वनविभागाच्या अधिकार्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी करत या मोरांचा मृत्यू पिकांवरील विषारी किटक नाशक मुळे झाला की शिकार्यानी लावलेल्या जाळ्यात आडकल्याने झाला याचा तपास सुरू केला आहे. तसेच सध्या बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव सुरू असल्याने त्या दृष्टीने देखील वन विभागाच्या अधिकार्यांनी मोर मृत्यू प्रकरणाचा तपास करणे गरजेचे आहे.
No comments:
Post a Comment