चिंभळे ग्रामपंचायत सरपंचपदी सौ. छाया गायकवाड तर उपसरपंचपदी राजेंद्र गायकवाड - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, February 12, 2021

चिंभळे ग्रामपंचायत सरपंचपदी सौ. छाया गायकवाड तर उपसरपंचपदी राजेंद्र गायकवाड

 चिंभळे ग्रामपंचायत सरपंचपदी सौ. छाया गायकवाड तर उपसरपंचपदी राजेंद्र गायकवाड


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
श्रीगोंदा ः श्रीगोंदा तालुक्यातील चिंभळे येथील ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच निवडणुकीत सरपंच पदी सौ. छाया संजय गायकवाड तर उपसरपंचपदी राजेंद्र वसंतराव गायकवाड यांची निवड झाली.
तालुक्यातील राजकीयदृष्ट्या महत्वाच्या असलेल्या चिंभळे सरपंच उपसरपंच निवडणुकीत भैरवनाथ ग्रामविकास पॅनलच्या सौ. छाया संजय गायकवाड यांची सरपंचपदी तर राजेंद्र वसंतराव गायकवाड यांची उपसरपंच पदी निवड झाली. या निवडीमध्ये भैरवनाथ ग्रामविकास पॅनलच्या सदस्या सौ.अनिता प्रशांत जाधव, राजेंद्र तुकाराम मुर्तमोडे, सौ.अंजना तुळशीराम रायकर, वैभव संभाजीराव गायकवाड, सौ.शुभांगी दिलीप गायकवाड, सर्व कार्यकर्ते यांची भूमिका निर्णायक ठरली. नूतन पदाधिकार्‍यांचे निवडीनंतर ग्रामस्थानी अभिनंदन केले.

No comments:

Post a Comment