आ.निलेश लंके यांच्या संकल्पनेतून साकारलेले दिव्यांग राज्यस्तरीय वधू वर परिचय मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद ! - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Monday, February 22, 2021

आ.निलेश लंके यांच्या संकल्पनेतून साकारलेले दिव्यांग राज्यस्तरीय वधू वर परिचय मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद !

 आ.निलेश लंके यांच्या संकल्पनेतून साकारलेले दिव्यांग राज्यस्तरीय वधू वर परिचय मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद !

राज्यभरातील 150 दिव्यांगांचा या परिचय वधू-वर मेळाव्यात  सहभाग तर 250 ऑनलाईन नोंदणी !

आ.लंके यांच्या उपस्थितीत किमान 05 अंपग जोडप्यांची दिली विवाहास पसंती !


पारनेर :
पारनेर नगर विधानसभा मतदार संघाचे राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व निलेश लंके प्रतिष्ठान व निलेश लंके दिव्यांग बहुउद्देशीय संस्थेच्या माध्यमातून साकारलेले दिव्यांग परिचय वधू वर मेळावा सुपा येथील सफलता लॉन्स येथे शनिवारी पार पडला .
         राज्यभरातून या अनोख्या दिव्यांग परिचय मेळाव्यास अनेक दिव्यांग बंधू युवक-युवतींने उपस्थित राहून या परीचय मेळाव्याची शोभा वाढवली.वास्तविक जीवनात अपंगत्व आलेल्या शेकडो अपंग युवक युवतीची जगण्यासाठीची धडपड स्वतःच्या अस्तित्वावर उभे राहात मार्गक्रमणा करावी असे प्रत्येक दिव्यांगांना वाटत असते परंतु परिस्थितीची हतबलता पाहता ठराविक समाजाने बहिष्कृत केलेल्या या बांधवांना स्वतःच्या पायावर सक्षमपणे उभे करण्यासाठी व स्वावलंबी बनविण्यासाठी आमदार लंके यांचा नेहमीच प्रयत्न असतो अपंगाची काठी होण्यासाठी आमदार लंके यांनी दिव्यांग कल्याणकारी संस्थेची स्थापना करून त्या संस्थेच्या माध्यमातून दिव्यांग बंधू-भगिनींना आधार देण्याचे काम करणारे निलेश लंके हे महाराष्ट्रातील एकमेव आमदार असावेत.
       सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. पं.समीती सभापती तथा निलेश लंके प्रतिष्ठानचे प्रांताध्यक्ष सुदामराव पवार होते, प्रस्थावीक चंद्रकांत मोढवे यांनी केले तर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन अपंग जिल्हा समन्वयक आप्पासाहेब ढोकणे  यांनी केले.
       अपंग संघटनेचे सुनील करंजुले यांच्यासमवेत अहमदनगर सचिव संतोष जाधव,राहुरी तालुका अध्यक्ष कडूभाई पठाण , नगर तालुका अध्यक्ष संजय पुंड, श्रीगोंदा तालुका अध्यक्ष सतीश वराडे, राजू भुजबळ, किशोर सूर्यवंशी ,संतोष ढवळे, उज्वला घोडके, सुनिता वाळेकर तसेच नाशिक अध्यक्ष सचिन पानमंद यांच्या नियोजना खाली हा वधुवर सुचक व परिचय मेळावा पार पडला 
        अपंग बांधवांन बद्दल असणारी तळमळ आमदार निलेश लंके यांनी वेळोवेळी बोलून दाखवली होती व त्यांना सहकार्य ही ते करत आले होते आमदार झाल्यानंतर आमदारकीच्या पगारातून प्रत्येक महिन्याला दिव्यांग बांधवांना तीन चाकी मोटर सायकल देणार असा शब्द देणारे आमदारांनी लंके यांनी तो शब्द खरा करूनही दाखवला व ते देतही आले आहेत प्रत्येक सोमवारी निलेश लंके अपंग बहुउद्देशीय संस्थेच्या माध्यमातून पारनेर येथील संपर्क कार्यालयात तालुक्यातील सर्व अपंग बांधवांच्या मूलभूत प्रश्नांची सोडवणूक आमदार निलेश लंके हे करत आहेत त्यात कुठलीही लाभाची योजना असो, अंत्योदय रेशन कार्डची योजना असो, किंवा अपंगांना मदत असो या सर्व गोष्टी संस्थेचे अध्यक्ष सुनील करंजुले व सुनीता वाळेकर या दर सोमवारी करत आहेत .
       अपंग वधू-वर सूचक व परिचय मेळाव्यास निलेश लंके प्रतिष्ठानचे प्रांताध्यक्ष सुदाम पवार,प्रांत उपाध्यक्ष बाळासाहेब खिलारी,खजिनदार दादा शिंदे, अॅड राहुल झावरे, सचिव पोटघन मेजर, अध्यक्ष बापूशेठ शिर्के, राष्ट्रवादी युवती अध्यक्षा पुनम ताई मुंगसे, श्रीकांत चौरे, सरपंच बाळासाहेब दळवी,सचिन पठारे, राजेंद्र शिंदे, राजूशेठ शेख, सचिन काळे, सचिन पवार, ज्ञानदेव लंके, सोपान दळवी, अंकुश रोकडे, संदीप मगर, दीपक लंके, अनिल करपे, पांडा कारखिले, दौलत गांगड ,राजेंद्र दळवी ,बाळासाहेब औटी,कवाद शेट गणेश कावरे यांच्यासह निलेश लंके प्रतिष्ठान व राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक पदाधिकारी हितचिंतक व  राज्यभरातून आलेले अपंग बांधव या वेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here