राजकारणापेक्षा समाजकारणाला महत्त्व देऊन पै. नाना डोंगरे यांचे समाजकार्य सुरु- नलगे - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Wednesday, February 17, 2021

राजकारणापेक्षा समाजकारणाला महत्त्व देऊन पै. नाना डोंगरे यांचे समाजकार्य सुरु- नलगे

 राजकारणापेक्षा समाजकारणाला महत्त्व देऊन पै. नाना डोंगरे यांचे समाजकार्य सुरु- नलगे

पटवर्धन चौकात पै. नाना डोंगरे यांचा सत्कार


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत निमगाव वाघाच्या ग्रामपंचायत सदस्यपदी सामाजिक कार्यकर्ते पै. नाना डोंगरे मताधिक्याने निवडून आल्याबद्दल अहमदनगर शहर राजीव गांधी युवा मंचचे अध्यक्ष अमोल नलगे यांनी त्यांचा सत्कार केला. शहरातील पटवर्धन चौकात झालेल्या सत्कार कार्यक्रमाप्रसंगी विनीत बुरला, भाऊसाहेब ठाणगे, किरण वल्लाकटी, बाळू बोडखे, निलेश गुंगुल, अमित बिल्ला, रवी दंडी, शंकर छिंदम आदी उपस्थित होते.
अमोल नलगे म्हणाले की, राजकारणापेक्षा समाजकारणाला महत्त्व देऊन पै. नाना डोंगरे यांचे समाजकार्य सुरु आहे. अनेक सामाजिक संघटनांमध्ये कार्यरत असल्याने त्यांच्या कामाचा अनुभव व वंचितांसाठी काम करण्याची तळमळ ग्रामपंचायतीच्या विकासात्मक कार्यासाठी मिळणार आहे. समाज सेवेचे व्रत स्विकारलेल्या व्यक्तीला ग्रामपंचायतमध्ये ग्रामस्थांनी दिलेली संधीचे ते सोने करणार असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.    
सत्काराला उत्तर देताना पै.नाना डोंगरे म्हणाले की, मागील वीस ते तीस वर्षापासून सामाजिक कार्य सुरु आहे. गावाच्या विकासात्मक कार्यासाठी नेहमीच पुढाकार राहिला आहे. या निवडणुकीत ग्रामस्थांनी निवडून देऊन मोठी जबाबदारी खांद्यावर टाकली असून, गावाच्या विकासासाठी नेहमीच प्रयत्नशील राहून ही जबाबदारी समर्थपणे पेलवणार असल्याचे सांगितले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here