विकास वाघविरोधात.. अत्याचाराचा गुन्हा दाखल. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Monday, February 22, 2021

विकास वाघविरोधात.. अत्याचाराचा गुन्हा दाखल.

 विकास वाघविरोधात.. अत्याचाराचा गुन्हा दाखल.


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः सध्या निलंबित असलेले तत्कालीन कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विकास वाघ यांच्या विरोधात महिलेने अत्याचार केल्याचा गुन्हा तोफखाना पोलिस ठाण्यात दाखल केला आहे.
महिलेने आपल्या फिर्यादीमध्ये म्हटले आहे की विकास वाघा मला 11 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी चार वाजता जिल्हा रुग्णालय हॉस्पिटलच्या पाठीमागे घेऊन गेला तेथे त्याने लाकडी दांडक्याने मारहाण करत तू माझ्या विरोधात दाखल केलेला गुन्हा मागे असे म्हणत मला गंगा उद्यान परिसरातील मिस्कीनमळा परिसरात घेऊन गेला तेथे विकास वाघने मंगळसूत्र आणि रोख 60 हजार रुपये हिसकावून नेल्याचा आरोप त्या महिलेने आपल्या फिर्यादीमध्ये केला आहे. या प्रकरणाबाबत सहाय्यक पोलीस निरीक्षक इडेकर हे पुढील तपास करीत आहे. यापूर्वीसुद्धा सप्टेंबर 2020मध्ये याच महिलेने कोतवाली पोलिस ठाण्यात विकास वाघ यांच्या विरुद्ध अत्याचार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर विकास वाघ यांना निलंबित करण्यात आले होते.

No comments:

Post a Comment