भगवान बाबा व वामनभाऊ पुण्यतिथी सोहळा उत्साहात संपन्न - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Monday, February 15, 2021

भगवान बाबा व वामनभाऊ पुण्यतिथी सोहळा उत्साहात संपन्न

 भगवान बाबा व वामनभाऊ पुण्यतिथी सोहळा उत्साहात संपन्न

कल्याण रोड परिसरातून भव्य मिरवणूक..


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः सालाबाद प्रमाणे यावर्षीही नगर शहरातील कल्याणरोडवरील शिवाजीनगर येथील पूनम सांस्कृतिकभवनामध्ये भगवानबाबा उत्सव कमिटीच्या वतीने भगवान बाबा व वामनभाऊ यांचा पुण्यतिथी सोहळा रविंद्र महाराज आव्हाड यांचे रामगिरी महाराज (येळी, ता.पाथर्डी) यांच्या प्रमुख उपस्थितीत कीर्तनाने मोठ्या उत्साहात पार पडला. कल्याण रोड परिसरातून भगवानबाबा व वामनभाऊ यांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक काढण्यात आली.
पुण्यतिथी सोहळा यशस्वीतेसाठी महिला आर्थिक विकास महामंडळचे अहमदनगर जिल्हा समन्वयक संजय गर्जे, नंदकिशोर सांगळे, बाळासाहेब दौंड, दिनकर आघाव, गोंविद गोल्हार, दत्तात्रय शिरसाठ, सुधाकर साबळे, बाळासाहेब आंधळे, शेकडेसर, वारे टेलर, अ‍ॅड सतीश गिते, अ‍ॅड संजय दराडे, अरुण ढाकणे, संजय गर्जे,सतीश गिते
आदिसह संत भगवानबाबा उत्सव कमिटीच्या सदस्यांनी मोठे परिश्रम घेतले. या पुण्यतिथी सोहळ्यास आमदार संग्राम जगताप, माजी उपमहापौर भाऊ बोरुडे, विरोधी पक्षनेते संजय शेंडगे, नगरसेवक शाम नळकांडे, सचिन शिंदे, गणेश कवडे, सचिन जाधव, संतोष गेनप्पा, दत्ता जाधव, दत्ता गाडळकर, संभाजी कदम, संजय आव्हाड, बाळासाहेब सानप आदिसह नगर शहरातील सर्व समाजातील नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here