सहकारी बँक निवडणूक उद्या मतदान - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, February 19, 2021

सहकारी बँक निवडणूक उद्या मतदान

 सहकारी बँक निवडणूक उद्या मतदान

अहमदनगर : अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाची निवडणूकप प्रक्रीया सुरु आहे. बँकेच्या 21 पैकी 17 जागा बिनविरोध झाल्याने उर्वरीत चार जागांसाठी उद्या शनिवार दि. 20 फेब्रुवारी रोजी सकाळी 8 ते दुपारी 4 वाजेपर्यंत मतदान होणार आहे. जिल्हयात प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी एक याप्रमाणे चौदा मतदान केंद्रातील 17 बुथवर मतदान प्रक्रियेचे काटेकोर नियोजन करण्यात आले असून मतदान केंद्रात मोबाईल नेण्यास मनाई करण्यात आली आहे. राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाच्या मान्यतेसह बँकेच्या निवडणूकीचा कार्यक्रम निवडणूक निर्णय अधिकारी दिग्विजय आहेर यांच्या नियंत्रणात प्रत्यक्षात सुरु आहे.
नगर, पारनेर व कर्जत येथे सेवा सोसायटी व बिगरशेती संस्थासाठीच्या मतदानासाठी प्रत्येकी दोन बुथ राहाणार आहेत. उर्वरीत मतदान केंद्रावर बिगरशेती संस्थासाठीच्या मतदानासाठी एकच बुथ असणार आहे. मतदान प्रक्रियेनंतर निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात दुसरे दिवशी रविवारी सकाळी 9 वाजता मतमोजणी प्रक्रिया होणार आहे.

No comments:

Post a Comment