सोलापूर महामार्गावर रास्ता रोको
वाळुंज बायपास रोडचे काम अर्धवट..
नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः वांळुज (ता. नगर) येथील बायपास रस्त्याचे काम आठ वर्षापूर्वी झाले. मात्र गावाजवळील एक किमी रस्त्याचे काम अपुर्ण ठेवले. या परीसरात मोठमोठाले खड्डे पडले आहे. धुळीचे प्रमाणही मोठ्या प्रमाणात आहे. अवजड वाहनामुळे पिकावर धुळ बसत आहे. यामुळे आजूबाजूच्या पिकांचे मोठया प्रमाणात नुकसान होत आहे. या संदर्भात जिल्हाधिकारी यांना निवेदन होते मात्र याची दखल न घेतल्यामुळे बाजार समितीचे उपसभापती संतोष म्हस्के याच्या नेतुत्वा खालीनगर सोलापूर महामार्गावर सोमवारी (दि.8) सकाळी रस्ता रोको आंदोलन करण्यात आले.
बाहयवळण रस्त्याच्या डागडुजीसाठी कोटयावधी रुपयांचे काम एका खाजगी एजन्सीला दिलेले होते. परंतू या एजन्सीने वेळकाढूपणा करुन रत्याचे काम पुर्ण न करता वाळूंज शिवारातील एक किलोमिटरचा रस्ता अपूर्ण ठेवला आहे. या खाजगी एजन्सीकडून वेळकाढूपणा केला जात असल्याच्या तक्रारी वरीष्ठ पातळीवर करण्यांत आल्या आहेत. बाहयवळण रस्त्याच्या नियोजीत कामसाठी प्रकल्प आराखडा व अंदाजपत्रकाचे काम खाजगी एजन्सीला देण्यांत आले आहे. हे काम पूर्ण झालेल्या सांगण्यांत येते. प्रत्यक्षात मात्र या एजन्सीकडून हा अहवाल देण्यास टाळाटाळ केली जात असल्याची माहिती राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या नाशिक विभागातील कार्यालयाकडून देण्यांत आली आहे. या एजन्सीने वाळूंज पासून एक किलोमिटर अंतराचे काम अपुर्ण ठेवले.
पंधरा दिवसाच्या आत या रस्त्याचा प्रश्न मार्गी लागला नाही तर बांधकाम विभागाच्या कार्यालयात येऊन आत्मदहन करण्यात येईल. असा इशारा यावेळी ग्रामस्थांनी दिला. वरिष्ठाशी चर्चा करुन या रस्त्याच्या दुरुस्ती साठी निधी इतर योजनेतून कसा मिळतो ते पाहू असे आश्वासन बांधकाम विभागाचे डि.एच. बांगर यांनी यावेळी दिले. शहरातील वाहतूक कोंडीची समस्या दूर करण्याच्या उददेशाने बाहयवळण रस्ता करण्यात आता. वाळूंज सोलापूर ते केडगांव पुणे रस्त्यापर्यंत राज्य सरकारणे सुमारे 39 किलो मिटर रस्त्यावर सुमारे तीस कोटी रुपये खर्च करुन बाहयवळण रस्त्याच्या कामास डिसेंबर 2004 मध्ये प्रशासकीय मंजूरी दिली होती. यावेळी मार्केट समितीचे उपसभापती संतोष म्हस्के यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात अनिल मोरे, बाळासाहेब दरेकर, मकरंद हिंगे, सुखदेव दरेकर, तात्यासाहेब दरेकर, संदीप मोरे, नवनाथ हिंगे, यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
No comments:
Post a Comment