पुढाकाराने करणार ऐतिहासिक ठेव्याचे पुनरुज्जीवन - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Monday, February 22, 2021

पुढाकाराने करणार ऐतिहासिक ठेव्याचे पुनरुज्जीवन

 पुढाकाराने करणार ऐतिहासिक ठेव्याचे पुनरुज्जीवन

स्मायलिंग अस्मिता कष्टकरी शेतकरी संघटनेच्या वतीने शिवजयंती साजरी...


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः अहमदनगर शहरात भाऊसाहेब फिरोदिया हायस्कूल येथे छत्रपती चौथे शिवाजी महाराज यांचे स्मृतीस्थळाला शिवाजी मंदिर संबोधले जाते.25 डिसेंबर 1883 रोजी छत्रपती चौथे शिवाजी महाराज यांचा खून अहमदनगरच्या भुईकोट किल्ल्यात ब्रिटिशांनी केला. त्यावेळी तत्कालीन कोर्ट असलेल्या सध्याच्या भाऊसाहेब फिरोदिया हायस्कूल प्रांगणात शासकीय इतमामात अग्नी दिला गेला. त्याठिकाणी त्याचं मंदिर वजा स्मृतीस्थळ उभारणी सुरू केले गेले परंतु ब्रिटिशांनी याला निर्बंध लादले त्याठिकाणी 1897 साली छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त शिवाजी उत्सव साजरा केला गेला आणि आयोजकांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला.
पुढे 1898 च्या प्लेगमध्ये रॅन्डच्या खुनाने राजकीय वातावरण प्रक्षुब्ध झाले. त्यामुळे राज्यभरात ब्रिटिशांनी कठोर कारवाई सुरू केली त्यामुळे शिवाजी मंदिरात लोक यायचे बंद झाले परंतु गेले 12 वर्ष झाले स्मायलिंग अस्मिता कष्टकरी शेतकरी विद्यार्थी संघटनेच्या माध्यमातून लालटाकी रोड येथील क्रांतीवीर छत्रपती चौथे शिवाजी महाराज स्मारक येथे शिवजयंतीच्या निमित्ताने बरोबर एक दिवस अगोदर शिवजयंती जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते आणि 19 फेब्रुवारी रोजी कोरोनामुळे बैलगाडी मिरवणूक रद्द करण्यात आली होती परंतु त्या ऐवजी सदरील शिवाजी मंदिरात जाऊन अभिवादन करण्यात आले.
यावेळी पोलीस उपअधीक्षक विशाल ढुमे नगरसेवक बाळासाहेब पवार संपुर्णा सावंत, श्रीपाद दगडे, स्मायलिंग अस्मिताचे कार्याध्यक्ष यशवंत तोडमल हेमंतराव मुळे विशाल म्हस्के श्रेयस सावंत आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. कोरोनामुळे मोजक्या इतिहास प्रेमींनी कार्यक्रमाला हजेरी लावली होती परंतु पुढील वर्षी आपण मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन उपस्थितांनी केले. सोशल मिडिया आणि कोल्हापूर येथील इतिहास प्रेमींनी याचे मोठ्या प्रमाणात स्वागत केले आहे.

No comments:

Post a Comment