येणार्‍या काळात नगर शहर विकसीत शहर म्हणून ओळखला जाणार- आ. संग्राम जगताप - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, February 24, 2021

येणार्‍या काळात नगर शहर विकसीत शहर म्हणून ओळखला जाणार- आ. संग्राम जगताप

 येणार्‍या काळात नगर शहर विकसीत शहर म्हणून ओळखला जाणार- आ. संग्राम जगताप

केडगाव, मोहिनी नगरला बंद पाईप गटार योजनेच्या कामाचा शुभारंभ


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः केडगाव, मोहिनी नगर येथील शिक्षक व कायनेटिक कॉलनीतील बंद पाईप गटार योजनेच्या कामाचा शुभारंभ आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते झाला. आमदार संग्राम जगताप म्हणाले की, केडगाव, मोहिनी नगर भागात अनेक दिवसांपासून ड्रेनेजचा प्रश्न प्रलंबीत होता. सदर कामाचा पाठपुरावा करुन नगरसेवक मनोज कोतकर यांनी सदर कामाला गती दिली. शहराचा व उपनगराचा झपाट्याने विकास होत असताना लोकवस्ती देखील वाढत आहे. येणार्या काळात नगर शहर विकसीत शहर म्हणून ओळखला जाणार. हे व्हिजन ठेऊन विकासात्मक दृष्टीने वाटचाल सुरु असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.  
यावेळी पुणे महिला राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षा व महानंदाच्या माजी चेअरमन वैशाली नागवडे, महिला व बालकल्याण समितीच्या सभापती लताताई शेळके, स्थायी समितीचे सभापती मनोज कोतकर, नगरसेवक गणेश नन्नवरे, राहुल कांबळे, बहिरू कोतकर, श्री निंबाळकर, गोडकर, शरद खरात, बाबा औशिकर, प्रसाद आंधळे, काळे सर, बच्चन कोतकर, अजित कोतकर, विजय सुंबे, अ‍ॅड. भोट, सचिन भोसले, अशोक गदादे, नाथा कोतकर, अशोक तांबे, अविनाश विधाते, विजय सुंबे, रानडे, कुलट, आयरेकर आदींसह प्रभागातील नागरिक उपस्थित होते.

No comments:

Post a Comment