शहराचा सर्वांगीण विकास करण्यासाठी प्रयत्नशील ः आ. संग्राम जगताप - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, February 5, 2021

शहराचा सर्वांगीण विकास करण्यासाठी प्रयत्नशील ः आ. संग्राम जगताप

 शहराचा सर्वांगीण विकास करण्यासाठी प्रयत्नशील ः आ. संग्राम जगताप


नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः शहरातील विकासात्मक दृष्टीकोनाने कामे सुरु आहेत. शहराचा सर्वांगीन विकास करुन एक वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी प्रयत्नशील आहे. अमृत योजना, भुयारी गटार, अंडरग्राउंड वायरिंग व फेज टू लाईन टाकण्यासाठी शहरातील अनेक रस्ते खोदण्यात आले होते. रस्त्याची झालेली दुरावस्थेची जाणीव ठेऊन रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी निधी मंजूर करुन ही कामे मार्गी लावण्याचे काम हाती घेण्यात आले असल्याचे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले. तर विकास आराखड्यातील सर्व रस्त्यांचे काम तातडीने होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
बागडपट्टी येथील सिताराम सारडा शाळे ते रुचिरा स्वीट्स नेता सुभाष चौक पर्यंत रस्त्याच्या डांबरीकरण कामाचा शुभारंभ आमदार जगताप यांच्या हस्ते झाला यावेळी ते बोलत होते.
याप्रसंगी महापौर बाबासाहेब वाकळे, उपमहापौर मालनताई ढोणे, विरोधी पक्षनेता संपत बारस्कर, भाजपचे जिल्हाध्यक्ष महेंद्र गंधे, नगरसेवक स्वप्नील शिंदे, अविनाश घुले, सुरेंद्र गांधी, सचिन जगताप, भानुदास बेरड, धनंजय जाधव, अभिजीत खोसे, सुरेखाताई विद्ये, शरद क्यादर, यशवंत ढोणे, विलास ताठे, संजय झिंजे, दिलदारसिंग बीर, अशोक सब्बन, अंजली वल्लाकटी, सुरेश इथापे, उपायुक्त प्रदीप पठारे, श्रीकांत निंबाळकर, सारंग पंधाडे, राजेंद्र विद्ये, विलास पेद्राम, जितेंद्र लांडगे, बाळासाहेब तांबे, प्रशांत नगरकर आदी परिसरातील नागरिक उपस्थित होते.
उपमहापौर मालनताई ढोणे म्हणाल्या की, बागडपट्टी येथील रस्त्यामुळे येथील नागरिक व व्यावसायिकांना धुळीचा व खड्ड्यांचा मोठा त्रास सहन करावा लागत होता. या रस्त्याचे काम हाती घेण्यात आले असून, नगरकरांना चांगल्या दर्जाचे रस्ते उपलब्ध होणार असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

No comments:

Post a Comment