चांगल्या क्षमता आपल्या माणसांसाठी वापराव्यात ः वसंतराव मुंडे - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Friday, February 12, 2021

चांगल्या क्षमता आपल्या माणसांसाठी वापराव्यात ः वसंतराव मुंडे

 चांगल्या क्षमता आपल्या माणसांसाठी वापराव्यात ः वसंतराव मुंडे


नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः पत्रकार हा समाजातील घटनांचा वाहक आहे. चांगल्या संकल्पना राबविण्याची भूमिका पत्रकार संघ नेहमीच घेतो. मात्र ज्यांच्यात क्षमता आहेत त्यांनी आपल्या क्षमता आपल्या माणसांसाठी वापराव्यात. असे आवाहन महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंतराव मुंडे यांनी केले.
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या राज्य कार्यकारिणीची बैठक बुधवार दि. 10 फेब्रुवारी रोजी राज्य संघटक संजय भोकरे यांच्या अध्यक्षतेखाली पुणे येथील कार्यालयात पार पडली त्यावेळी ते बोलत होते. सरचिटणीस विश्वास आरोटे, वृत्तवाहिनी प्रमुख रणधीर कांबळे, सांस्कृतिक विभाग प्रमुख संदिप भटेवरा, उमेश कुलकर्णी, अनिल बिबवे, पुणे विभागीय अध्यक्ष नितीन शिंदे, राज्य माध्यम समन्वयक भगवान राऊत, प्रदेश प्रसिद्धी प्रमुख नवनाथ जाधव, मराठवाडा विभागीय अध्यक्ष वैभव स्वामी आदी यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते.
आपल्या 1 वर्षाच्या काळातील कार्याचा अहवाल त्यांनी यावेळी सादर केला. पत्रकार संघाच्या वतीने राज्यात 11 रुग्णवाहिका प्रशासनाला देण्यात आल्या. कोरोना महामारी व लॉक डाऊनच्या काळात वेबिनारच्या माध्यमातून 28 जिल्ह्यातील पत्रकारांशी संवाद साधला. गरजू पत्रकारांना मदत केली. राज्य संघटक संजय भोकरे म्हणाले की, महाराष्ट्र राज्य पत्रकार संघटना तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे. आपल्याला अशाच पद्धतीने पुढे जायचे आहे. दोन्ही हातांनी चांगले काम करा म्हणजे हजारो हात तुमच्या मदतीसाठी तुमच्या पाठीशी उभे राहतील. आपले कुटुंब, समाज आणि देश यांच्याप्रती असणार्‍या जबाबदारीचे भान आपण ठेवले पाहिजे आणि पत्रकारिता हाच धर्म समजून आपण ही संघटना पुढे घेऊन जाणार आहोत असे ते म्हणाले.उत्तर महाराष्ट्र विभागाचे अध्यक्ष प्रविण सपकाळे, मराठवाडा विभागाचे अध्यक्ष वैभव स्वामी, ठाणे विभागाचे अध्यक्ष भगवान चंदे आणि राज्य माध्यम समन्वयक भगवान राऊत यांनी आपला कार्य अहवाल मांडला. यावेळी पुणे विभागीय कार्यकारिणीची निवड करण्यात आली. तसेच महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले. कोरोना काळात हजारो गरजू लोकांना अन्नधान्य  व किराणा वाटप करणारे इंदापूर येथील पत्रकार अनिल मोहिते आणि सहकारी यांचा विशेष सत्कार करण्यात आला. वैभव स्वामी यांनी प्रास्ताविक व सूत्रसंचालन केले. विश्वास आरोटे यांनी आभार मानले. या बैठकीस पत्रकार संघाचे राज्यभरातील पदाधिकारी, विभागीय अध्यक्ष, प्रदेश कार्यकारिणी सदस्य उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here